कोल्हापूर : येथील नवीन राजवाड्यासमोर शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवारी उत्साहात पार पडला. सनई चौघड्याच्या निनादात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे शिवरायांची सुवर्णमूर्ती मुख्य आकर्षण होते.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने दुर्गराज रायगडावर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राज्याभिषेक सोहळा पार पडला. तर कोल्हापूर येथे नवीन राजवाड्याच्या प्रांगणात प्रथमच झालेल्या सोहळ्याची सुरुवात सनई चौघड्याच्या वादनाने झाली. मराठा लाइट इन्फंट्री बँड बेळगावचे सादरीकरण लक्षवेधी होते.

Bhoomipujan, Mahaprasad Gruh,
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ६५ कोटी खर्चाच्या नव्या महाप्रसादगृहाचे भूमिपूजन; एक लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ
sakal hindu samaj, Kolhapur,
विशाळगड अतिक्रमण प्रश्नी संभाजीराजेंचा राजकीय हेतू कोणता? कोल्हापुरात सकल हिंदू समाजाची विचारणा
Horse arena in Tukoba palanquin ceremony Pune print news
‘रिंगण सोहळा पाहिला म्या डोळा’; तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अश्वांचे रिंगण
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony 2024, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony received in satara, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi in satara, aashadhi Ekadashi 2024,
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे साताऱ्यात मोठ्या उत्साहात स्वागत
Chandrapur, Mother, poisoned,
चंद्रपूर : आधी पोटच्या गोळ्याला विष पाजले, मग स्वतः घेतला गळफास; त्या मातेने का उचलले टोकाचे पाऊल?
Rasta Roko movement of Shivpremi in Kolhapur
कोल्हापुरात शिवप्रेमींचे रास्ता रोको आंदोलन
Married woman commits suicide in farm with baby nashik
विवाहितेची बाळासह शेततळ्यात आत्महत्या
ram janmabhoomi chief priest satyendra das
“पहिल्याच पावसात राम मंदिरातील गाभाऱ्याला गळती”; मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराजांचा दावा!

हेही वाचा – तापमान वाढ रोखण्याचा कोल्हापुरात पर्यावरण दिनी निर्धार

शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणी, युवराज मालोजीराजे, मधुरीमाराजे छत्रपती, यौवराज यशस्विनीराजे, यशराजराजे यांच्यासह करवीरकरांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन; काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस

पोवाडा, शौर्य गीत, मराठी स्फूर्ती गीत, करवीर झंजपथक, मर्दानी खेळांचा थरार अनुभवायला मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात जुना राजवाडा येथे शिवराज्याभिषेक दिन झाला. लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती विजयी झाल्यानंतरचा हा पहिलाच राज्याभिषेक सोहळा असल्याने उत्साह पाहायला मिळाला.