ब्राझीलच्या रिओ दी जनेरो शहरात सुरु असलेल्ये नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्ण तर सौरभ चौधरीने कांस्यपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने २४४.२ तर सौरभ चौधरीने २२१.९ गुणांची कमाई केली. तुर्कीच्या इस्माईल केलेसने २४३.१ गुणांसह रौप्यपदक कमावलं.
१० मी. एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक आणि सौरभ या दोन्ही भारतीय खेळाडूंनी आपला ऑलिम्पिक प्रवेश याआधीच निश्चीत केला आहे. याव्यतिरीक्त ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्यपदकाची कमाई करत ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2019 2:14 pm