News Flash

तब्बल ८ महिन्यांनी BCCI ने पोस्ट केला धोनीचा फोटो, कारण…

वन-डे विश्वचषकानंतर धोनीला अद्याप संघात स्थान नाही

करोना रोगाच्या तडाख्यामुळे सध्या देशभरात भीतीचे वातावरण आहे. सारेच देश या रोगावर मात करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. करोनाच्या भीतीने अनेक मोठे कार्यक्रम, संमेलने आणि कॉर्पोरेट इव्हेंट्सदेखील रद्द करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रालाही याचा फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. तर काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

Video : भररस्त्यात चहलचे गाल ओढणारी ती तरूणी कोण?

भारतातील आघाडीची टी २० लीग म्हणजेच IPL देखील २९ मार्चपासून सुरू होणार होते, मात्र करोनाच्या तडाख्यामुळे IPL १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. या स्थगितीनंतर IPL च्या यंदाच्या हंगामातील सामन्यांची संख्या कमी करून छोटेखानी IPL खेळवण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय IPL 2020 चे आयोजन जुलै ते सप्टेंबर या दरम्यान करण्यात येण्याचीदेखील चर्चा सुरू आहे. या साऱ्या गोंधळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकृत ट्विटर हँडलवरून तब्बल ८ महिन्यांनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

“तोंडावर खरं बोलणारी माणसं कोणालाच आवडत नाहीत…”; माजी मुंबईकर क्रिकेटपटूचं सडेतोड मत

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा एकदिवसीय विश्वचषक २०१९ नंतर क्रिकेटच्या मैदानावर अद्याप परतलेला नाही. IPL 2020 च्या माध्यमातून त्याला आपला खेळ दाखवायची संधी होती, पण करोना व्हायरसच्या फटक्यामुळे IPL चे आयोजन लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीला आता आपण इतरांसारखाच खेळ करू शकतो हे दाखवून देण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र BCCI ने अचानक धोनीचा एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोत धोनी स्मितहास्य करताना दिसत आहे. करोना व्हायरसच्या भयभीत वातावरणात छानपैकी हसत राहण्याचा संदेश या फोटोच्या माध्यमातून BCCI ने दिला आहे.

CoronaVirus : BCCI चे अध्यक्ष फावल्या वेळात काय करत आहेत बघा…

IPL नंतर डीव्हिलियर्स पुन्हा आफ्रिकेकडून खेळणार?

दरम्यान, नुकतेच धोनीबद्दल अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात सेहवागने मत व्यक्त केले. सेहवाग म्हणाला की आता धोनी संघात कोणत्या जागी खेळणार? लोकेश राहुल आणि ऋषभ पंत हे दोन प्रतिभावंत फलंदाज आणि यष्टीरक्षक सध्या संघाकडे आहेत. या दोघांची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत या दोघांनाही एकाच वेळी संघातून बाहेर काढण्याचं कोणतंही कारण मला तरी दिसत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 9:06 pm

Web Title: bcci posts ms dhoni photo after a long while and give important message to fans amidst coronavirus outbreak vjb 91
Next Stories
1 Video : भररस्त्यात चहलचे गाल ओढणारी ती तरूणी कोण?
2 करोनाचा फटका WWE लाही; रिकाम्या खुर्च्यांसमोर खेळाडूंची रेसलिंग
3 “तोंडावर खरं बोलणारी माणसं कोणालाच आवडत नाहीत…”; माजी मुंबईकर क्रिकेटपटूचं सडेतोड मत