27 September 2020

News Flash

ब्रॉडनेच इंग्लंडला करुन दिली युवीच्या सहा षटकारांची आठवण

स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर युवराज सिंगने लगावलेले सहा चेंडूतील सहा षटकार प्रत्येक भारतीयाला आजही लक्षात आहेत...

सहा षटकार म्हंटले की प्रत्येक भारतीयाला आठवतात ते स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर युवराज सिंगने लागवलेले सहा चेंडूतील सहा षटकार. यात विशेष म्हणजे हा पराक्रम युवीने टी२० विश्वचषकादरम्यान केला होता. त्यावेळी युवीने १२ चेंडूत ५० धाव करत एका विक्रमाशी बरोबरी देखील केली होती. या पराक्रमाला जवळपास ११ वर्ष होऊन गेली, पण तरीदेखील सध्या हा पराक्रम चर्चच्या आला आहे.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा नवोदित अष्टपैलू खेळाडू सॅम कुरान याने सहा षटकार लगावले. हे षटकार त्याने सलग लगावले नव्हते. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ६ षटकार लगावले आणि केवळ १ चौकार फटकावला. त्याच्या या खेळीची क्रिकेटविश्वात दखल घेण्यात आली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याचे अभिनंदन तर केलेच. पण यासह ECBने एक इंस्टाग्रामवर एक पोस्टही टाकली. यात चौकार लागवण्याआधी कोणत्या खेळाडूने सहा षटकार लगावलेले आठवत आहेत का? असा थोडासा मुजोर प्रश्न ECBने इंस्टाग्रामवर विचारला.

 

View this post on Instagram

 

Ever seen someone smash six sixes before they hit their first four? #slveng #englandcricket

A post shared by We Are England Cricket (@englandcricket) on

त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. पण त्यात इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याची प्रतिक्रिया सर्वात महत्वाची ठरली. त्याच्या प्रतिक्रियेमुळे त्या प्रश्नातील हवाच निघून गेली आणि इंग्लंडसाच्या गर्वाचे घर आपोआपच खाली झाले.

दरम्यान, नेटकऱ्यांनीही ब्रॉडच्या रिप्लायनंतर ECBची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 12:53 pm

Web Title: broads reply of yuvrajs sixes on ecbs instagram post left ecb silent
टॅग Yuvraj Singh
Next Stories
1 चाहत्यासाठी काहीपण! गाडी थांबवून धोनीने घेतली छोट्या फॅनची भेट
2 आयपीएलमध्ये सहभागी व्हायचंय तर या अटी मान्य करा; क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खेळाडूंना ताकीद
3 भारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली
Just Now!
X