क्रिकेटमधील सामन्यांची वाढती संख्या पाहता खेळाडू त्यांच्या इच्छेनुसार विश्रांती घेऊ शकतात, असे भारताचा माजी कर्णधार कपिलदेव यांनी येथे सांगितले.
कपिलदेव यांनी सांगितले, ‘कसोटी, एकदिवसीय व ट्वेन्टी-२० सामन्यांमुळे दिवसेंदिवस खेळाडूंवर ताण पडण्याची शक्यता असते. व्यावसायिक क्रिकेटपटूंनाही काही वेळा एक-दोन सामने खेळण्याची इच्छा नसते. मात्र क्रिकेटचा अतिरेक होत आहे काय, याबाबत मत व्यक्त करणे अवघड आहे. कारण मी आता खेळाडूच्या भूमिकेत नाही. याबाबत सध्याच्या खेळाडूंनीच मत देणे उचित ठरेल.’