ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू मायकल हसी भारताचा युवा प्रतिभावंत फलंदाज शुबमन गिलच्या फलंदाजीचा फॅन झाला आहे. हसीनं दुसऱ्या कसोटीनंतर गिलचं कौतुक केलं आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दबावात असताना गिलनं पहिल्या डावात ४५ आणि दुसऱ्या डावांत नाबाद ३५ धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीदरम्यान गिलने अनेक आकर्षक फटके मारले. त्यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीनं मायकल हसी प्रभावीत झाला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे ८ गड्यांनी दारुण पराभवही स्विकारावा लागला होता. या मानहानीकारक पराभवानंतरही भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुनरागमन केलं. दुसऱ्या कसोटीत पृथ्वी शॉच्याजागी युवा शुबमन गिलला संधी देण्यात आली होती. गिलनेही मिळालेल्या संधीचं सोनं करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली.  दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर बोलताना हसीनं पदार्पण करणाऱ्या गिलवर कौतुकाचा वर्षाव केला.

आणखी वाचा- “चांगली लोकं नेहमी…”, सौरव गांगुलीकडून मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचं कौतुक

हसी म्हणा की,  ‘भारतीय संघानं पहिला कसोटी सामना ९० मिनिटांतट गमावला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात सर्व बाबी भारतीय संघाच्या बाजूनं घडल्या. अजिंक्य रहाणेनं केलेले चार बदल विजयासाठी कारणीभूत ठरले. पहिल्याच कसोटी सामन्यात शुबमन गिलला संधी मिळायला हवी होती. गिलने कठीण प्रसंगात छोटेखानी खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. गिल एक प्रतिभावंत खेळाडू आहे. बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण करणारा गिल भविष्यात भारतीय संघाच्या फंलदाजीचा मुख्य कणा ठरेल. पुढील दहा वर्ष गिल भारतीय संघाकडून खेळू शकतो. ‘

आणखी वाचा- सर जाडेजानं रचला इतिहास; धोनी-कोहलीच्या खास पंगतीत मिळालं स्थान

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या सिराजच्या कामगिरीमुळेही हसी प्रभावित झाला. सिराजनं शमीच्या कमी जाणवून दिली नाही असं हसी म्हणाला. शमीच्य अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी कमकुवत होईल असं वाटलं होतं. मात्र सिराजनं ऑस्ट्रेलियाला कोणताही संधी दिली नाही, असं हसी म्हणाला.