तडाखेबाज फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजी अशा दुहेरी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अखेरच्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात केली. पहिल्या दोन सामन्यांपैकी दोनही संघाने १-१ सामना जिंकला होता. त्यामुळे हा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि टी २० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

INDvWI : वेस्ट इंडिजची धुलाई करणारा राहुल म्हणतो…

तिसऱ्या सामन्यात एक चित्तथरारक प्रसंग घडला. भारताच्या डावाचे पाचवे षटके सुरू होते. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पिअरने गोलंदाजी केली. रोहितने त्या चेंडूचा समाचार घेण्याच्या दृष्टीने चेंडू हवेत उंच टोलवला. चेंडू सीमारेषेपार जाणार की फिल्डरच्या हाती विसावणार, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यावेळी सीमारेषेवर एव्हिन लुईसने अत्यंत चित्तथरारक पद्धतीने तो चेंडू उडी मारून हवेतच झेलला. पण इतक्यात आपण सीमारेषेबाहेर जाणार आहोत ते त्याला समजले. त्यामुळे त्याने चेंडू सीमारेषेच्या आत फेकला आणि तो स्वत: मैदानाबाहेर गेला. पण तसे असूनही तो अतिशय चपळाईने आत आला आणि त्याने चेंडू पुन्हा यष्टीरक्षकाकडे फेकला.

INDvsWI : …म्हणून वेस्ट इंडिजला हरवलं – विराट

२४० धावा करू शकलो असतो, पण… – पोलार्ड

टी २० मालिकेत भारताची बाजी

भारताने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा ठोकल्या. सलामीवीर रोहित शर्मा-लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा पराक्रम केला. विंडीजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत लोकेश राहुलने ९१, रोहित शर्माने ७१ तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७० धावा केल्या. पंतने मात्र पुन्हा एकदा निराशा केली. विंडीजकडून कोट्रेल, विल्यम्स आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

सामना गमावला, तरीही पोलार्डने केला धमाकेदार पराक्रम

या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत चौकार-षटकार खेचले. हेटमायर ४१, तर पोलार्ड ६८ धावा करून बाद झाला. भुवनेश्वर, शमी, चहर आणि कुलदीप यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.