30 September 2020

News Flash

IPL 2019 : ….आणि रविंद्र जाडेजाची ती परंपरा अखेर खंडीत

मुंबईविरुद्ध सामन्यात जाडेजाला विश्रांती

आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जने गेल्या वर्षीप्रमाणे बाद फेरीत आपलं स्थान जवळपास पक्क केलं आहे. शुक्रवारी घरच्या मैदानावर चेन्नईसमोर मुंबईचं आव्हान असल्यामुळे सर्व चाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या होत्या. मात्र या सामन्यात नाणेफेकीसाठी महेंद्रसिह धोनीऐवजी सुरेश रैना उतरला आणि सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसला.

चेन्नईने मुंबईविरुद्धच्या सामन्यात ३ बदल केले. महेंद्रसिंह धोनीसह रविंद्र जाडेजा आणि फाफ डु प्लेसिसलाही या सामन्यात विश्रांती देण्यात आली. मात्र यामुळे रविंद्र जाडेजाची एक परंपरा खंडीत झाली.

२०१२ साली चेन्नईच्या संघाने जाडेजाला आपल्या संघात कायम राखलं. यानंतर आतापर्यंत जाडेजा प्रत्येक सामन्यात चेन्नईकडून मैदानात उतरला आहे. आतापर्यंत जाडेजाने चेन्नईकडून ९७ सामने खेळले आहेत. चेन्नईकडून एखादा सामना न खेळण्याची जाडेजाची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 8:40 pm

Web Title: ipl 2019 ravindra jadeja is missing his first ever for csk
Next Stories
1 भास्कर कांबळी मुंबई महापौर श्री
2 IPL 2019 CSK vs MI : चेन्नईला नमवून मुंबई ‘किंग’; ४६ धावांनी विजयी
3 Asian Boxing Championship : अमित पंघलला सुवर्णपदक
Just Now!
X