News Flash

IPL मध्ये कोणीही बोली न लावल्याने म्हणाला होता ‘ही लाजिरवाणी गोष्ट’, धडाकेबाज खेळाडूला SRH ने दिली संधी

अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने माघार घेतल्याने धडाकेबाज सलामीवीराला मिळाली संधी...

( जेसन रॉयचं संग्रहित छायाचित्र, सौजन्य- बीसीसीआय )

आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू होण्यासाठी आता १० दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिलाय. अशात सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून माघार घेतली आहे. पण, त्याच्याजागी हैदराबादने इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.

फेब्रुवारी महिन्यात आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव चेन्नईत पार पडला. त्यावेळी लिलावात जेसन रॉयवर कोणत्याच संघाने लावली नव्हती. एकाही संघाने खरेदी न केल्यामुळे रॉय निराश झाला होता. नंतर त्याने सोशल मीडियावर “यंदा आयपीएलचा भाग नसणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया दिली होती. पण, आता मिशेल मार्शने माघार घेतल्यामुळे २ कोटी रुपये या बेस प्राइसमध्ये हैदराबादने रॉयला आपल्या संघात घेतले आहे.


रॉयने २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत आयपीएलमध्ये तो गुजरात लायन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलाय. आयपीएलच्या आठ सामन्यांमध्ये रॉयच्या नावावर १३३.५८ च्या स्ट्राइक रेटने केवळ १७९ धावा आहेत, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यात रॉयने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या शानदार फॉर्मचा फायदा सनरायझर्स हैदराबादला होऊ शकतो.

आणखी वाचा- IPL 2021 : धोनीच्या CSK ला मोठा धक्का, आयपीएलमधून तिसऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने घेतली माघार

दरम्यान, मिशेल मार्शने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतल्याचं सनरायझर्स हैदराबादने ट्विट करुन म्हटलंय. मात्र, करोनामुळे खेळाडूंसाठी बायो बबलमध्ये रहाणं अनिवार्य आहे, पण मार्शला बायो बबलमध्ये जास्त काळ राहायचे नव्हते, त्यामुळे त्याने माघार घेतल्याचं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2021 9:37 am

Web Title: jason roy who said it was massive shame not to be involved in the ipl signs up with srh as replacement for mitchell marsh sas 89
टॅग : IPL 2021
Next Stories
1 आयपीएलमध्ये ‘हा’ नियम मोडला की, कर्णधारच होणार ‘आऊट’!
2 Video: सरावात षटकारांची बरसात, IPL मध्ये सात वर्षांनी पुनरागमनासाठी सज्ज टीम इंडियाचा फलंदाज
3 ऋषभ पंतला दिल्लीचा कर्णधार केल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणतो….
Just Now!
X