वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी गमावणाऱ्या इंग्लंडच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरने bio-security नियमांचा भंग केल्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आलं आहे. ESPNCricinfo ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. आयसीसीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तब्बल ४ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटने पुनरागमन केलं होतं. यावेळी आयसीसीने करोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला नियम आखून दिले होते. ज्यात संघातील खेळाडूंना बाहेरील व्यक्तींशी संपर्कात येणं टाळायचं होतं. एखादा खेळाडू संघाबाहेरील व्यक्तीशी संपर्कात आल्यास त्याला काही दिवस स्वतःला क्वारंटाइन करणं अपेक्षित आहे. जोफ्रा आर्चरने नेमकं कोणत्या वेळी या नियमांचा भंग केला हे समजू शकलेलं नाहीये. पण खबरदारीचा उपाय म्हणून इंग्लंडने आर्चरला संघातून वगळलं आहे. आर्चरने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त करत स्वतःला क्वारंटाइन केलं आहे.