News Flash

धोनीच्या जवळच्या खेळाडूंना होती निवृत्तीची माहिती, रखडलेल्या टी-२० विश्वचषकामुळे घेतला निर्णय

टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलल्यामुळे धोनीने घेतला निर्णय

आज संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांनी मी निवृत्त झालोय असं समजावं…स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी इन्स्टाग्राम अकाऊंटवर धोनीने एक छोटोसा व्हिडीओ पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. धोनीने निवृत्तीसाठी साधलेली वेळ आणि दिवस यावरुन अजुनही अनेक चर्चा सुरु आहेत. धोनीने अचानक जाहीर केलेली निवृत्ती हा सर्व चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का असला तरीही त्याच्या जवळच्या व्यक्ती आणि खेळाडूंना त्याच्या या निर्णयाची आधीपासूनच माहिती होती. पूर्वीप्रमाणे धोनीचं शरीर त्याला आता साथ देत नव्हतं, तरीही टी-२० विश्वचषक खेळण्याची त्याची इच्छा प्रबळ होती. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धेत धोनीला खेळायचं होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने ही स्पर्धा पुढे ढकलली आहे.

२०१९ विश्वचषकात न्यूझीलंडकडून झालेला पराभव हा धोनीच्या जिव्हारी लागला होता. काही महिन्यांपूर्वी धोनीच्या घरी पार पडलेल्या एका पार्टीमध्ये त्याच्या जवळच्या मित्राने तो टी-२० विश्वचषकानंतर खेळणार नाही असं सांगितलं होतं. पण आयपीएलमध्ये तो खेळत राहिल. परंतू जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपला अखेरचा सामना खेळण्याचं धोनीचं स्वप्न अखेरीस स्वप्नच राहिलं. “त्याचं शरीर आता थकलंय, पहिल्यासारखं ते आता साथ देत नाही याची कल्पना धोनीलाही आहे. पण टी-२० विश्वचषक खेळून तो अधिकृतरित्या निवृत्त होणार होता. यंदाच्या वर्षात टी-२० विश्वचषक होत नसल्यामुळे निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ असल्याचं धोनीला पटलं होतं.” धोनीच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या खेळाडूने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली.

अवश्य वाचा – धोनीची निवृत्ती अचानक नाही, पत्र लिहून BCCI ला दिली होती कल्पना

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपूष्टात आल्यानंतर धोनी भारतीय संघाबाहेर होता. तत्कालीन निवड समितीने धोनीला आता संघात स्थान मिळणार नाही हे जाहीर केलं होतं. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी धोनीने CSK चे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनीवासन यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. चेन्नईकडून पुढचे काही हंगाम खेळत राहणार असल्याचं धोनीने सांगितलं असून भविष्यातही संघाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला धोनीला आवडणार आहे. गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात निवृत्तीबद्दल विचारलेल्या प्रश्नालाही धोनीने, जानेवारीपर्यंत विचारु नका असं उत्तर दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 9:31 am

Web Title: ms dhonis retirement wasnt a surprise to the inner circle psd 91
Next Stories
1 धोनीची निवृत्ती अचानक नाही, पत्र लिहून BCCI ला दिली होती कल्पना
2 धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षी भावनाविवश, पोस्ट लिहून म्हणाली…
3 BLOG : बरं झालं, निवृत्त झालास !
Just Now!
X