News Flash

“…तर रोहितची फटकेबाजी थांबवणं अशक्यच”

पाहा काय म्हणतोय न्यूझीलंडचा गोलंदाज

भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने रोहितवर स्तुतीसुमनं उधळली होती. “रोहितला मैदानावर खेळताना बघायला मला खूप आवडतं. तो एक उत्तर क्रिकेटपटू आहे. त्याच्या खेळाची शैली अप्रतिम आहे. त्याच्या याच शैलीवर काही वेळा मला इर्ष्या वाटते”, असे संगाकारा म्हणाला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडच्या मध्यमगती गोलंदाजानेही रोहितची स्तुती केली.

न्यूझीलंडचा मध्यमगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने स्पोर्ट्सकीडाला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला गोलंदाजी करण्यासाठी अवघड असा फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला होता. त्यावर फर्ग्युसन म्हणाला, “मला काही फलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड वाटतं. पण त्यातही रोहित शर्माला गोलंदाजी करणं सर्वात आव्हानात्मक आहे. जर तुम्ही रोहित शर्माला लवकर स्वस्तात बाद केलं नाहीत, तर त्याने मोठी खेळी केलीच समजा. तो अतिशय प्रतिभावंत फलंदाज आहे.”

“स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली हे फलंदाजदेखील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांना गोलंदाजी करणंदेखील कठीण असतं. पण जेव्हा तुम्ही वरच्या फळीतील फलंदाजांना लवकर बाद करता तेव्हा तुम्हाला मधल्या आणि तळाच्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळते आणि बळी मिळण्याची शक्यता मिळते”, फर्ग्युसन म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 8:14 pm

Web Title: new zealand pacer lauds rohit sharma says if you dont get him out quickly he goes big vjb 91
Next Stories
1 वेलकम ज्युनियर पांड्या! हार्दिक-नताशा जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव
2 हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; फोटो केला शेअर
3 Video : “युवराजच्या ‘त्या’ प्रश्नाचं माझ्याकडे आजही उत्तर नाही”
Just Now!
X