ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरनं गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलंच. शिवाय फलंदाजीला आल्यानंतर सर्वांना चकीतही केलं आहे. मराठमोळ्या शार्दुल ठाकूरनं कसोटीमधील आपली पहिली धाव षटकारानं काढली आहे. असा करणारा शार्दुल ठाकूर दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने हा कारनामा केला आहे. पंतनं पदार्पणाच्या सामन्यातच षटकार ठोकत कसोटीतील पहिली धाव षटकारानं काढली होती.

भारतीय संघातील आघाडीचे फलंदाज धावांसाठी झगडत असताना शार्दुल ठाकूर मैदानात उतरला. आघाडीचे सहा फलंदाज तंबूत परतले होते. भारतीय संघ १८० धावांनी पिछाडीवर असताना शार्दुल ठाकूरनं कोणताही दबाव न घेतला खणखणीत षटकार लगावत आपलं महत्व दाखवून दिलं. शार्दुलनं कसोटीत आपलं धावांचं खातं षटकारानं उघडलं आहे. असा पराक्रम करणारा शार्दुल दुसरा भारतीय तर १३ जागतिक खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंतनं इंग्लंडविरोधात आदिल रशिदला षटकार लगावत आपलं धावाचं खातं उघडलं होतं.

कसोटीत षटकारानं धावांचं खातं उघडणारे फलंदाज –
शार्दुल ठाकूर (२०२०-२१)
ऋषभ पंत (२०१८-१९)
धनंजया डिसल्वा (२०१६-१७)
मार्क क्रीग (२०१४-१५)
अल- अमिन हुसेन (२०१३-१४)
जौहराल इस्लाम (२०१०-११)
डेल रिचर्ड्स (२००९-१०)
सुनैल अम्ब्रीस (२००७-०८)
कमरुल इस्लाम (२००६-०७)
कैथ डबेंगावा (२००५-०६)
कार्लेस बेस्टt (१९८६-८७)
इरीक फ्रीमन (१९६८-६९)