News Flash

शास्त्री मास्तरांचं ‘ते’ ट्विट ठरतंय चर्चेचा विषय

आयपीएल 2021च्या दुसऱ्या सामन्याआधी केले होते ट्विट

फोटो सौजन्य : ट्विटर

आज आयपीएल 2021चा दुसरा सामना खेळवला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमने सामने आले आहे. एकीकडे अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे, तर दुसरीकडे धोनीचा उत्तराधिकारी ऋषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे. सर्वांना या द्वंद्वाची उत्सुकता लागली होती. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या उत्सुकतेपोटी एक भन्नाट ट्विट केले आहे.

रवी शास्त्री यांनी चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यापूर्वी एक ट्विट केले. ”गुरू वि. चेला, खूप मजा येईल, स्टम्प माइक ऐकत राहा”, असे शास्त्रींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पंत आणि धोनी हे खेळाडू सामन्यादरम्यान यष्टीमागे अनेकदा गमतीशीर वक्तव्य करतात. हे सर्व स्टम्प माइकमधून चाहत्यांना ऐकायला मिळते. त्यामुळे शास्त्रींनी हे ट्विट केले आहे.

 

दोन यष्टीरक्षक कर्णधार असलेले महेंद्रसिंह धोनी आणि ऋषभ पंत यांच्या रणनितीकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून आहे. ऋषभ पंत पहिल्यांदाच कर्णधारपदाच्या भूमिकेत मैदानात उतरला आहे. ऋषभ पंतकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते. तर धोनी आदर्श असल्याचे पंतने वारंवार सांगितले आहे. दुसरीकडे कर्णधारपद यशस्वीरित्या भूषवलेल्या धोनीकडे अनुभवाची शिदोरी आहे. त्यामुळे कोण कुणावर भारी पडणार याची उत्सुकता लागली आहे.

दोन्ही संघाचे विदेशी खेळाडू 

आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजुने लागला असून ऋषभ पंतने चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. दिल्ली संघात शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉइनिस, ख्रिस वोक्स,  टॉम करन या विदेशी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तर, चेन्नई संघात मोईन अली, फाफ डु प्लेसिस, सॅम करन आणि ड्वेन ब्राव्हो या विदेशी खेळाडूंना जागा देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 7:58 pm

Web Title: ravi shastri made hilarious tweet before csk vs dc match adn 96
टॅग : IPL 2021,Ravi Shastri
Next Stories
1 करोनाबाधित अक्षर पटेलच्या प्रकृतीत सुधारणा; दिल्ली कॅपिटल्सकडून माहिती
2 CSK vs DC : दिल्लीची चेन्नईवर सहज मात, शॉ-धवन ठरले विजयाचे शिल्पकार
3 ‘‘माझ्यासाठी सुरेश रैनाची…’’, सामन्यापूर्वी दिल्लीच्या पाँटिंगने रैनाविषयी केले वक्तव्य
Just Now!
X