News Flash

धोनीसाठी वय हा मुद्दा गौण, विश्वचषकानंतरही संघात खेळू शकतो – सौरव गांगुली

वयापेक्षा खेळ चांगला असणं महत्वाचं !

2018 सालामध्ये फॉर्म गमावून बसलेल्या धोनीवर विश्वचषकाआधीच संघातून निवृत्त होण्यासाठी दबाव वाढला होता. मात्र वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे मालिकेमध्ये धोनीने दमदार पुनरागमन केलं. यानंतर न्यूझीलंड दौऱ्यातही धोनीने चांगल्या धावा केल्या. यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने, विश्वचषकानंतरही धोनी भारतीय संघात खेळू शकतो असं मत व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – मैदानातील स्वतःच्या स्टँडचं उद्घाटन करायला धोनीचा नकार, म्हणाला मी तर घरातलाच माणूस !

“विश्वचषकानंतरही धोनी भारतीय संघात खेळू शकतो. जर भारत विश्वचषक जिंकला आणि धोनीने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर त्याने निवृत्ती का स्विकारावी? जर तुमच्याकडे चांगली प्रतिभा असेल तर वय हा मुद्दा गौण ठरतो.” सौरव कोलकात्यात पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता. यावेळी सध्याच्या भारतीय संघाचं सौरव गांगुलीने कौतुक केलं.

विश्वचषकात भारतीय गोलंदाज संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलतील असंही गांगुली म्हणाला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे गोलंदाज सध्या चांगलेच फॉर्मात आहेत. त्यामुळे या गोलंदाजांचं चांगलं खेळणं भारतीय संघासाठी महत्वाचं आहे. विश्वचषकासाठी अतिरीक्त गोलंदाज म्हणून गांगुलीने उमेश यादवच्या नावाला पसंती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 7:27 pm

Web Title: sourav ganguly backs ms dhoni to continue after 2019 world cup says age never a factor before talent
टॅग : Ms Dhoni,Saurav Ganguly
Next Stories
1 Video : …म्हणून आफ्रिकेच्या फलंदाजाने ड्रेसिंग रूममध्ये रागाच्या भरात आपटली बॅट
2 IND vs AUS : धोनीचा मास्टरप्लॅन! …आणि कुलदीपने उडवला मॅक्सवेलचा त्रिफळा
3 आयपीएलदरम्यान थकवा जाणवल्यास जरुर विश्रांती घेईन – भुवनेश्वर कुमार
Just Now!
X