News Flash

सिंधू, श्रीकांत, कश्यप दुसऱ्या फेरीत

श्रीकांतने ०-१ अशा पिछाडीवरून जपानच्या तकुमा उएडाचा १२-२१, २१-१८,२१-११ असा पराभव केला.

| March 3, 2016 05:24 am

भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यपसह सातवी मानांकित पी. व्ही. सिंधू या अव्वल बॅडमिंटनपटूंनी जर्मन ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेत पुरुष एकेरीच्या सलामीचा अडथळा सहज पार केला.

श्रीकांतने ०-१ अशा पिछाडीवरून जपानच्या तकुमा उएडाचा १२-२१, २१-१८,२१-११ असा पराभव केला. सहाव्या मानांकित श्रीकांतला पुढील फेरीत नेदरलॅण्डच्या एरिक मेइज्सशी सामना करावा लागणार आहे. कश्यपने पहिल्या फेरीत उक्रेनच्या अ‍ॅर्टेम पोटॅरेव्हवर २१-९, २१-९ असा सहज विजय मिळवला.  ११व्या मानांकित कश्यपला दुसऱ्या फेरीत आर्यलडच्या जोशूआ मॅगीविरुद्ध खेळावे लागेल. युवा बॅडमिंटनपटू समीर वर्मा यानेही सोप्या विजयाची नोंद केली. त्याने दिमित्रो झाव्हादस्कीवर २१-९, २१-८ असा विजय मिळवला. भारताच्याच कौशल धर्मामेरला १४व्या मानांकित मार्क झ्विब्लेरने २१-४, २१-१४ असे नमवले.

महिला एकेरीतील सामन्यात सातव्या मानांकित पी. व्ही. सिंधूने पहिल्या फेरीत बिरमानांकित अमेरिकेच्या रोंग श्ॉफरवर ३१ मिनिटांत २१-११, २१-१३ असा सोपा विजय मिळवला. पुढील फेरीत तिच्यासमोर कॅनडाच्या मिशेल लीचे आव्हान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2016 5:24 am

Web Title: srikanth kashyap sindhu in 2nd round after easy wins
टॅग : Sindhu
Next Stories
1 भारतीय महिला टेबल टेनिस संघ मुख्य फेरीत
2 बंगाल वॉरियर्स, पुणेरी पलटण प्रथमच उपांत्य फेरीत 
3 भारत-पाक सामना धरमशालामध्ये खेळवण्याबाबत साशंकता
Just Now!
X