न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
स्टार्कने २१व्या षटकातील चौथा चेंडू १६०.४ किलोमीटर प्रती ताशी (९९.७ मैल/तास) वेगाने टाकला. किवी फलंदाज रॉस टेलरने या चेंडूचा सामना केला. क्रिकेट विश्वात १६० किमी प्रती ताशी वेगाचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रम फक्त चार गोलंदाजांना दाखवता आला आहे. सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम जरी पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर असला, तरी १६० किमी प्रती ताशी वेगाने चेंडू टाकणाऱ्या पाच गोलंदाजांच्या पंक्तीत चार जण ऑस्ट्रेलियाचे आहेत.

१६१.३ किमी/ तास
ताशी शोएब अख्तर (पाकिस्तान)

१६१.१ किमी/ तास
शॉन टेट आणि ब्रेट ली

१६०.६ किमी/ तास
जेफ थॉमसन (ऑस्ट्रेलिया)

१६०.४ किमी/ तास
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)