News Flash

विराट कोहलीने इतक्यात सर्व प्रकारांमध्ये कर्णधारपद स्विकारण्याची घाई करू नये- गावस्कर

विराट कोहलीने स्वत:चा आणखी विकास होऊन द्यावा.

| May 11, 2016 07:13 pm

Virat Kohli : गेल्या काही दिवसांत कोहलीने ट्वेन्टी-२० विश्वचषकांसह अन्य स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

विराट कोहलीने इतक्यातच भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद स्विकारण्याची घाई करू नये, असे मत भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. विराटने सर्व प्रकारात भारतीय संघाचे कर्णधारपद भुषविण्यापेक्षा स्वत:चा आणखी विकास होऊन द्यावा. सध्या तो कसोटी संघाचा कर्णधारपदी योग्य आहे. २०१९ सालचा विश्वचषक अजून खूप दूर आहे. त्यामुळे क्रिकेटच्या इतर प्रकारांमध्ये त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनविण्याची घाई केली जाऊ नये, असे गावस्कर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत कोहलीने ट्वेन्टी-२० विश्वचषकांसह अन्य स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर विराट लवकरच महेंद्रसिंग धोनीची जागा घेईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
२०१९च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत धोनी कर्णधारपदावर टिकल्यास आश्चर्य -गांगुली 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 7:13 pm

Web Title: virat kohli should not be rushed into captaincy in all formats says sunil gavaskar
Next Stories
1 पुण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात
2 मुंबईला हरवून विजयी घोडदौड राखण्यास बंगळुरू उत्सुक
3 ‘क्रीडा स्थाना’त खेळांचा ‘आवाज’ दबलेला!
Just Now!
X