News Flash

कौतुकास्पद! विनामुल्य Oxygen Concentratorसाठी सेहवागने सुरू केला हेल्पलाइन नंबर

व्हिडिओ शेअर करत सेहवागने दिली माहिती

वीरेंद्र सेहवाग

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग करोना पीडितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याने हजारो गरजूंना घरगुती भोजन विनामूल्य दिले होते. आता त्याने देशातील करोना पीडितांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसाठी एक हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.

सेहवागने ९०२४३३३२२२ हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. या नंबरवरून करोना संक्रमित व्यक्तीचे नातेवाईक व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची सुविधा मिळवू शकतात. वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटर अकाउंटवर यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सेहवाग या व्हिडिओत म्हणतो, “नमस्कार मित्रांनो, आज एक गोष्ट सांगणार आहे. माझा जवळचा मित्र होता. २-३ आठवड्यांपूर्वी त्याचा अचानक फोन आला. त्याचा आवाज ऐकून मला असे वाटले की काही झाले नाही, तर कदाचित हा मित्र आपल्याला सोडून जाईल. बर्‍याच ठिकाणी फोन केला. २-३ तासांनंतर एक ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध झाला. मी यापूर्वी कॉन्सट्रेटरचे नावही ऐकले नव्हते. ही गोष्ट ऑक्सिजनची पातळी सामान्य करण्यासाठी मदत करते.”

 

“अनेक निरुपयोगी लोकांनी काळाबाजार करून ५०-६० हजार किमतीची ही वस्तू २-३ लाखांना विकली आहे. गरीब माणूस सतत पैसे जमा करत राहिला आणि अनेक जीव गमवावे लागले. असे कोणासोबतही होऊ नये. दिल्लीत आम्ही एक विनामूल्य ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची बँक तयार केली आहे. जर तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला नितांत गरज असेल तर तुम्ही ते वापरू शकता आणि गरज संपल्यानंतर ते परत देऊ शकता, जेणेकरून दुसऱ्याला त्याचा फायदा होईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 7:32 pm

Web Title: virender sehwag releases a help line number to get free oxygen concentrator adn 96
Next Stories
1 BCCIचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे करोनामुळे निधन
2 “रोहितचं चरित्रच वेगळं, तो एक cool माणूस”
3 टी-२० वर्ल्डकपचं भवितव्य काय? BCCI ‘या’ तारखेला घेणार बैठक
Just Now!
X