करोनामुळे सध्या संपूर्ण क्रीडा विश्व ठप्प आहे. हे संकट दूर झाल्यानंतर या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी BCCI अनोखी युक्ती वापरणार असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाला एकाच दिवशी दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळवता येऊ शकतात, असे BCCI च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतातील आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे येत्या काळात जर सर्व काही लवकरच सुरळीत झाले, तर क्रिकेटच्या स्पर्धांचे एकामागोमाग एक आयोजन करून नफा मिळवण्यासाठी BCCI प्रयत्नशील आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले आहे.

रैनाच्या मागणीवर BCCI चं रोखठोक उत्तर

‘‘एकाच दिवशी भारताचे दोन विविध खेळाडूंचे संघ मैदानावर उतरवून दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्याचा विचार सध्या BCCI करत आहे. उदाहरणार्थ जर विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांसारखे अनुभवी खेळाडू कसोटी सामना खेळत असतील, तर त्याच दिवशी सायंकाळी श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांसारख्या युवा खेळाडूंचा समावेश असलेला भारताचा दुसरा संघ एखादा टी २० सामना खेळू शकतो. या प्रकारे चाहत्यांचेही मनोरंजन होईल व प्रायोजक, क्रीडा वाहिन्यांसह BCCI ला आर्थिक लाभ होईल,’’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

T20 World Cup : धोनी, धवन संघाबाहेर; समालोचकाने जाहीर केला संघ

याबाबत एका लाइव्ह चॅटमध्ये माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने झकास उत्तर दिले. “जर एकाच वेळी एकाच शहरात भारतीय संघ दोन सामने खेळणार असला, तर मी विराटच्या नेतृत्वाखालील सामना न पाहता रोहितच्या नेतृत्वाखालील सामना पाहण्याचा पसंती देईन. विराट हा एक उत्तम खेळाडू आहे आणि त्याची क्रिकेट कारकीर्द उल्लेखनीय आहे यात वादच नाही. पण रोहितची शैली वेगळी आहे. तो जेव्हा फटकेबाजी करतो तेव्हा सामना पाहायला अधिक मजा येते आणि महत्वाचे म्हणजे गोलंदाजाला कळतही नाही त्याच्यावर आता हल्ला चढवला जाणार आहे”, असं मोहम्मद कैफने स्पष्ट केले.

धोनीच्या प्लॅनिंगपुढे पॉन्टींगही फिका – माईक हसी

यापूर्वी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे श्रीलंका आणि भारताविरुद्ध झालेल्या लागोपाठच्या दोन सामन्यांसाठी दोन संघ मैदानावर उतरवले होते. २२ फेब्रुवारी रोजी अ‍ॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाचा एक संघ श्रीलंकेविरुद्ध टी २० सामना खेळला होता, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पुणे येथे कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती.