करोना विषाणूचा सामना करण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. कालांतराने केंद्र सरकारने हळुहळु काही भागांमध्ये दैनंदीन व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिली. अद्याप भारतात कोणत्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु झालेल्या नाहीत. खेळाडूंना सरावासाठी परवानगी मात्र देण्यात आलेली आहे. बहुतांश भारतीय क्रिकेटपटू सध्या घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत, तर काही खेळाडूंनी परवानगी घेऊन सरावाला सुरुवात केली आहे.

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आपली पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत घरात वेळ घालवत असतो. अजिंक्यने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला.

अजिंक्यचा हा फोटो आणि पोस्ट पाहिल्यानंतर त्याचा मुंबईकर साथीदार रोहित शर्माने त्याला, भावा तुला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करणं गरजेचं आहे असं म्हटलंय.

ज्यावर अजिंक्यनेही तितकच समर्पक उत्तर दिलंय.

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान होण्याती शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआय वर्षाअखेरीस या स्पर्धेचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे.