भारतीय क्रिकेट संघाने २ एप्रिल २०११ ला आयसीसी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. २ दिवसांपूर्वी त्या घटनेला ९ वर्षे पूर्ण झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. या विजयामुळे भारताने पुन्हा एकदा २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकला.

Photo : दोन वेळा लग्न करणारे लोकप्रिय क्रिकेटपटू

विश्वचषक विजेतेपदाला ९ वर्षे झाल्यानंतर साऱ्यांनी त्या आठवणींना उजाळा दिला. भारताचे प्रशिक्षक आणि अंतिम सामन्यात समालोचक असणारे रवी शास्त्री यांनीही ट्विट करत आठवणी जागवल्या. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाच टॅग केले.

IPL : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज… ‘या’ ५ खेळाडूंनी दोनही संघाकडून मिळवलं विजेतेपद

२०११ विश्वचषकाचा नायक युवराजला हे रूचले नाही. त्याने रवी शास्त्री यांच्या ट्विटवर ‘तुम्ही आम्हाला ज्येष्ठ आहात. मला आणि धोनीलाही यात टॅग केलं असतं तर चाललं असतं’, असा खोचक रिप्लाय दिला.

त्यानंतर रवी शास्त्री यांनी युवराजच्या टोल्यावर सारवासारव करणारे उत्तर दिले.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘हा’ फोटो व्हायरल

असा रंगला होता अंतिम सामना

प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २७४ धावांचा डोंगर रचला होता. ज्यामध्ये महेला जयवर्धनेने १०३ धावा केल्या होत्या. कुमार संघकाराने या सामन्यात ४८ धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या खेळाडूंसमोर गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघातील युवराज सिंह आणि झहिर खान या दोघांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले होते. लंकन खेळाडूंच्या फटकेबाजीनंतर चाहत्यांच्या पाठिंब्याच्या साथीने भारतीय संघ मैदानात उतरला.

सुरुवातीपासूनच श्रीलंकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. सेहवाग आणि सचिन हे दोन्ही खेळाडू, ज्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या ते अगदी स्वस्तात तंबूत परतले होते. पण, गौतम गंभीरने भारताची बाजू सांभाळत ९७ धावा केल्या. ज्यात भर पडली ती म्हणजे कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ९१ धावांची. धोनीच्या या धावांमध्ये त्याच्या फलंदाजीचं कौतुक करावं तितकं कमीच होतं. पण, मुळात त्याने मारलेला शेवटचा षटकारच या सामन्यात खऱ्या अर्थाने ‘चार चाँद’ लावून गेला. धोनीच्या त्या षटकारामुळे आणि संघातील प्रत्येक खेळाडूच्या योगदानामुळे भारताने १९८३ नंतर २८ वर्षांनी विश्वचषक उंचावला.