२०१६मध्ये आशियाई फुटबॉल महासंघाच्या १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताने उत्सुकता दाखवली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत.
यासंदर्भात आशियाई फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस दातो अलेक्स सोसे आणि उपसरचिटणीस दातो विंडसर जॉन यांच्याशी भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी चर्चा केली आहे. भारताच्या प्रस्तावावर आशियाई महासंघाने समाधान व्यक्त केले आहे. ही स्पर्धा आयोजित केल्यास २०१७मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाच्या आयोजनासाठी भारताची चांगली तयारी होऊ शकेल, असा विश्वास आशियाई महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.