Ab de Villiers on Rohit Sharma moving to RCB : आयपीएल २०२५ साठी रिटेन आणि रिलीज होणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. स्टार फलंदाज रोहित शर्माचे मुंबई इंडियन्ससह भवितव्य एक गूढ राहिले आहे. गेल्या मोसमात मुबंईने रोहितला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याची नियुक्ती केली होती. हार्दिकला मुंबईने गुजरातडून ट्रेड केले होते. मात्र, मुंबईचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नव्हता. आता आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने रोहित शर्माबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

२०२४ मध्ये मुंबई संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला होता. त्यानंतर हार्दिक आणि रोहितमध्ये मतभेद असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले होते. आता आयपीएल मेगा ऑक्शन जवळ आल्याने रोहित लिलावात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल २०२५ मोठ्या लिलावादरम्यान रोहितला खरेदी करण्याची संधी मिळाली, तर त्याल खरेदी करावे अशी विनंती केली होती.

एबी डिव्हिलियर्स रोहित शर्माबद्दल काय म्हणाला?

मात्र, आरसीबीचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सला वाटते की रोहित आरसीबीमध्ये जाण्याची शक्यता नाही. यूट्यूबवर थेट प्रश्न-उत्तर सत्रादरम्यान डिव्हिलियर्स म्हणाला, ‘रोहितबद्दल कैफच्या टिप्पणीवर मी खूप हसलो. जर रोहित मुंबई इंडियन्समधून आरसीबीमध्ये गेला तर ती मोठी गोष्ट असेल. त्यामुळे अजून काय सांगायची गरज असणार नाही. तेव्हा चर्चा काय असेल याची जरा कल्पना करा. हार्दिक पंड्याच्या ट्रेडपेक्षाही ही मोठी बातमी असेल. गुजरात टायटन्समधून तो मुंबईला परतला, हे आश्चर्यकारक नव्हते. पण जर रोहित त्याच्या कट्टर प्रतिस्पर्धी आरसीबीत आला तर नक्कीच मोठी गोष्ट असेल. मात्र, तो आरसीबीत येईल असं वाटत नाही. कारण मला वाटतं नाही की, मुंबई इंडियन्स रोहितला सोडेल. तसेच रोहितला मुंबई सोडेल याची शक्यता शून्य किंवा ०.१ टक्के आहे.’

हेही वाचा – Shivam Dube : रोहित की धोनी, कोण आहे आवडता कर्णधार? शिवम दुबेने चतुराईने दिलेल्या उत्तराचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एबी डिव्हिलियर्स फॅफबद्दल काय म्हणाला?

डिव्हिलियर्सने आरसीबीचे कर्णधारपद फॅफकडे ठेवण्याचे समर्थन केले आहे. त्याने सांगितले की कोहलीला देखील अनुभवी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आपल्या पदावर कायम राहावेसे वाटेल. तो म्हणाला, ‘वय हा फक्त एक आकडा आहे. मला माहित नाही की तो ४० वर्षांचा असणे ही समस्या का असेल. तो तेथे काही हंगाम खेळला आहे आणि खेळाडूंना त्याच्यासमोर आरामदायक वाटते. मला समजते की फॅफवर दबाव आहे. कारण त्याने आरसीबीसाठी ट्रॉफी जिंकली नाही, परंतु तो एक खेळाडू म्हणून असाधारण आहे. मला वाटते की विराट त्याला पूर्ण साथ देईल.’