भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्यांचा सर्वकालीन आवडता वनडे फलंदाज निवडला आहे. स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान मांजरेकर यांना त्यांचा ऑल टाइम ग्रेटेस्ट वनडे फलंदाज निवडण्यास सांगण्यात आले, ज्यावर माजी क्रिकेटपटूने त्यांचे मत दिले. त्यांनी विराट किंवा सचिनचे नाव न घेता एका विदेशी खेळाडचे नाव घेतले.

मांजरेकर म्हणाले, “दोन्ही फलंदाज आपापल्या काळातील महान फलंदाज आहेत. पण माझ्या मते, वेस्ट इंडिजचा दिग्गज विवियन रिचर्ड्स हा सर्वकालीन महान एकदिवसीय फलंदाज आहे. रिचर्ड्सने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये, ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. त्याचे रेकॉर्ड हे दर्शवतात की ते कोणत्या प्रकारचे फलंदाज होते. ते नेहमीच माझे सर्वकालीन महान एकदिवसीय फलंदाज असतील.”

मांजरेकर पुढे म्हणाले, ”सध्याच्या क्रिकेटमध्ये कोहली निश्चितपणे एक महान फलंदाज आहे. तो या यादीत नक्कीच असेल. गेल्या २० वर्षात विराट कोहली महान फलंदाजांच्या यादीत आहे. तेंडुलकर हा देखील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहली माझ्या पुस्तकात एक महान एकदिवसीय फलंदाज आहे. माझ्या मनात आणखी एक खेळाडू येतो, तो दुसरा कोणी नसून एमएस धोनी आहे. पण ऑल टाईम वनडे बॅट्समनचा विचार केला, तर रिचर्ड्सच्या जवळ कोणीही नाही. तुम्हाला माझे शब्द थोडे जुन्या पद्धतीचे वाटतील.”

हेही वाचा – IND vs NZ ODI Series: इशान किशन थोडक्यात बचावला! नाही तर मुकला असता ‘या’ गोष्टीला; जाणून घ्या काय आहे प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांजरेकर रिचर्ड्सबद्दल म्हणाले, ”त्यांच्या काळात जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचा ज्या प्रकारचा प्रभाव होता, तो आश्चर्यकारक होता. ते ७० आणि ९० च्या दशकात अशा वेळी खेळले, जेव्हा सर्व टॉप-क्लास बॅट्समन, गॉर्डन ग्रीनिज सारख्या लोकांची सरासरी 30 च्या आसपास होती. त्यांचा स्ट्राइक रेट ६० च्या आसपास होता. विव्ह रिचर्ड्स ७० ते ९० च्या दशकापर्यंत, विश्वचषकातील शतकाचा समावेश आहे. त्यांची सरासरी ४७ आणि त्यांचा स्ट्राइक रेट ९० होता. त्यांची फलंदाजी जगाला हादरवायची.”