Chetan Sharma Sting Operation: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबत एका वृत्तवाहिनीच्या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळात भूकंप झाला आहे. चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय क्रिकेटबाबत केलेल्या खुलाशानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे खळबळजनक खुलासे अशा वेळी झाले आहेत जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळवली जाणार आहे आणि पुढील दोन सामन्यांसाठीही संघ निवडला जाणार आहे. मुख्य निवडकर्त्याच्या या खुलाशाने जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची मन शरमेने खाली गेली.

बीसीसीआयने अलीकडेच चेतनला दुसऱ्यांदा निवड समितीचे अध्यक्ष केले. यापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याला हटवण्यात आले होते. झी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माला विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंवर हल्ला करताना दाखवण्यात आले आहे. त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्याशी झालेल्या संभाषणाचाही खुलासा केला आहे.

Election duty staff starts distribution of EVM and VVPAT machines
EVM मुळे भाजपाला अतिरिक्त मते? निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणाले, “कोणत्या पक्षाला कोणतं चिन्ह जाणार हे…”
EVM
“निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा”, EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं!
Salman Khan
धमकीचे पत्र, ई-मेल आणि घराबाहेर गोळीबार! बॉलिवूडचा टायगर गँगस्टरच्या रडारवर का आहे?
Sonu sood defend swiggy delivery boy for stealing shoes shared x post
“कोणतीही कारवाई…”, शूज चोरणाऱ्या डिलीव्हरी बॉयची सोनू सूदने घेतली बाजू; पण, नेटकऱ्यांनी केला विरोध

चेतन शर्मा यांच्यावर कारवाई केली जाईल

बीसीसीआय हे प्रकरण गांभीर्याने घेत असून आता मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह लवकरच याप्रकरणी कारवाई करणार आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की “राष्ट्रीय निवडकर्ते कराराने बांधील असल्याने त्यांना माध्यमांशी बोलण्याची परवानगी नाही.”

बीसीसीआयचे सचिव जय शाह कारवाई करतील

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “चेतन शर्मांच्या भवितव्याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह निर्णय घेतील. टी२० कर्णधार हार्दिक पांड्या किंवा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा हे अंतर्गत चर्चा उघड करू शकतात हे जाणून चेतनसोबत निवड बैठकीत बसायचे का, असा प्रश्न उपस्थित होतो.”

हेही वाचा: Cheteshwar Pujara: १०० व्या कसोटीपूर्वी पंतप्रधान मोदींनी चेतेश्वर पुजाराला दिला विजयाचा मंत्र, जाणून घ्या दोघांमध्ये काय घडले

चेतन शर्माने आरोप केला की ८० ते ८५ टक्के तंदुरुस्त असूनही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये झटपट पुनरागमन करण्यासाठी खेळाडू इंजेक्शन घेतात. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी बुमराहच्या पुनरागमनावरून त्याच्या आणि संघ व्यवस्थापनामध्ये मतभेद असल्याचा आरोपही माजी वेगवान गोलंदाजाने केला होता. बुमराह सध्या संघाबाहेर आहे आणि चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता नाही. माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला.

माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला. ते म्हणाले की, “तो विराट कोहलीच्या विरोधात आहे कारण तो स्वत:ला खेळापेक्षा वरचा समजतो. पण जेव्हा त्याचा खराब फॉर्म चालू होता तेव्हा त्याने टी२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर आम्ही त्याला वन डे फॉरमॅटच्या कर्णधारपदावरूनही काढून टाकले.”

ते म्हणाले की, “पण जेव्हा विराटने टी२० फॉरमॅटचे नेतृत्व सोडले तेव्हा बीसीसीआय मर्यादित षटकांमध्ये दोन वेगळे कर्णधार ठेवण्याच्या बाजूने नव्हते. पण विराट कोहलीला वन डे संघाचे कर्णधारपद सोडायचे नव्हते. त्याला कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार राहायचे होते. पण मी (निवड समितीसह) त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतले.”

हेही वाचा: WPL Auction: कोणी घर घेणार तर कोणी कर्ज फेडणार! छोट्या लेकींची मोठी स्वप्ने होणार साकार, WPLने आयुष्य होणार प्रकाशमान

चेतन शर्मा म्हणाले की, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात थोडासा अहंकार आहे, परंतु ते धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांना साथ देतात. संघात असा कोणताही पक्षपातीपणा नसून खेळाडूंच्या निवडीत त्यांचा मोठा प्रभाव असल्याचे खुद्द मुख्य निवडकर्त्याने उघड केले.”