WPL Auction 2023: वुमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या सीझनसाठी मुंबईत लिलाव पार पडला. Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. ३० परदेशी खेळाडूंसह एकूण ८७ खेळाडू विकले गेले. टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.४० कोटी रुपयांची यशस्वी बोली लावून स्मृती यांचा आपल्या संघात समावेश केला.

WPL खेळाडूंचे स्वप्न पूर्ण करेल

WPLने महिला खेळाडूंना असे व्यासपीठ दिले आहे. जिथे ती तिची प्रतिभा जागतिक पटलावर उतरवणार आहे. यासोबतच डब्ल्यूपीएल या खेळाडूंना नवीन जीवन देणार आहे. लिलावात ज्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला आहे, त्यात असे काही खेळाडू आहेत ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती आणि आता लिलावाने त्यांना नवे व्यासपीठ दिले आहे. या खेळाडूला आता लिलावाच्या पैशातून तिचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. काहींना स्वत:साठी घर घ्यायचे आहे, तर काहींना या लिलावातून मिळालेल्या पैशातून कर्ज फेडायचे आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

उदाहरणार्थ, टीम इंडियाची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषला मोठी किंमत मिळाली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १.९० कोटी रुपयांना संघात समाविष्ट केले. आता रिचा घोषला या पैशातून तिच्या आई-वडिलांसाठी फ्लॅट घ्यायचा आहे. रिचा घोष म्हणाली, ‘माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते की मी भारतासाठी खेळावे. मला माझ्या संघाचे नेतृत्व करायचे आहे आणि भारतासाठी मोठी ट्रॉफी जिंकायची आहे. मला कोलकात्यात फ्लॅट घ्यायचा आहे. माझ्या आई आणि वडिलांनी तिथे स्थायिक व्हावे आणि त्यांच्या आयुष्याचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे.

भारतीय संघाची फिरकीपटू राधा यादवलाही यूपी वॉरियर्सने ४० लाखांची किंमत देऊन लिलावात समाविष्ट केले आहे. राधा यादव यांचेही एक घर विकत घेण्याचे स्वप्न आहे जिथे तिचे कुटुंब चांगले राहू शकेल. आता राधा यादव यांचे हे स्वप्न निश्चितच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्याचप्रमाणे इतर खेळाडूंचीही स्वतःची इच्छा असते.

अंजली सरवाणीचे वडील रमणराव म्हणतात, “ ही खूप मोठी गोष्ट आहे! आमच्या कुटुंबात, हजारात येणाऱ्या पैशाबद्दल बोलणे देखील खूप मोठी गोष्ट आहे.” आता अडोनीची वेगवान गोलंदाज अंजली सरवाणी यूपी वॉरियर्सला ५५ लाख रुपयांना घेतली गेली. अमनजोत कौरचे वडील भूपिंदर सिंग (तिला मुंबई इंडियन्सने ५० लाख रुपयांमध्ये साइन केले होते) म्हणाले की, “आता त्यांच्या मुलीला स्वत:वर खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करण्याची गरज नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे.

हेही वाचा: Sachin Tendulkar: अरे हिला लिलावात घ्यायला विसरलात! चिमुकल्या लेकीचे शॉट्स पाहून क्रिकेटचा देवही भारावला, पाहा Video

आता, ती क्रिकेटमध्ये तिचे पैसे गुंतवू शकते किंवा जास्त खर्च करत असल्यास विचार न करता तिला पाहिजे ते खरेदी करू शकते. यामुळे तिला आर्थिक ताणातून मुक्ती मिळेल आणि तिला एकट्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल,” अमनजोतचे वडील म्हणाले. फक्त अंजली आणि अमनजोत नाही, तर केरळमधील मिन्नू मणी आणि त्यांच्यासारखे बरेच काही आहेत ज्यांना याचा फायदा त्यांनाच होणार आहे.