India Vs Bangladesh Playing 11, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सलग ४ सामने जिंकले आहेत. सुपर ४ फेरीत भारतीय संघाचा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामना आज दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.
भारतीय संघातील खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. ज्या ज्या खेळाडूंना संधी मिळाली आहे, त्यांनी संधीचं सोनं करून विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. भारतीय संघात स्थान मिळालेल्या रिंकू सिंगला या स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे आज बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. त्याला अक्षर पटेलच्या जागी संधी दिली जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुन्हा एकदा विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.
भारत – बांगलादेश हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि बांगलादेश यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर भारतीय संघाचं पारडं जड आहे. कारण दोन्ही संघ १७ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान बांगलादेशला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर उर्वरित सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यातही एकतर्फी विजयाची नोंद करू शकतो. पण खेळाडूंना सावध राहावं लागेल. कारण लिटन दास आणि तोहीद हृदोय हे दोघेही चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. गेल्या सामन्यात या संघाने श्रीलंकेवर विजय मिळवला होता.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारतीय संघ: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/ रिंकू सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/ अर्शदीप सिंग.
बांगलादेश : सेफ हसन, तंजीद हसन तमीम, लिटन दास (कर्णधार आणि यष्टिरक्षक), तोहीद हृदोय, शमीम हुसेन, जाकिर अली, महेदी हसन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.