Australia vs Pakistan 2nd Test Match: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. आज उपाहारानंतर तिसरे अंपायर मैदानावर उशिरा पोहोचल्याने सामना उशिरा सुरू झाला, त्यावेळी एक विचित्र घटना पाहायला मिळाली. वास्तविक, थर्ड अंपायर लिफ्टमध्ये अडकले होते, म्हणूनच खेळाडू मैदानात पोहोचूनही सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. गुरुवारी कसोटीचा तिसरा दिवस आहे. पहिले सत्र संपले, लंच ब्रेकनंतर सर्व खेळाडू मैदानात पोहोचले. मात्र जेव्हा सामना सुरू व्हायला हवा होता, तेव्हा सुरू झाला नाही. थर्ड अंपायर जागेवर नसल्यामुळे मैदानावरील अंपायनी सामना सुरू होऊ दिला नाही. काही मिनिटांतच तिसरे अंपायर त्यांच्या जागेवर आले आणि त्यानंतर काही मिनिटांच्या विलंबाने सामना सुरू झाला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या कसोटी दरम्यान थर्ड अंपायर लिफ्टमध्ये अडकले

अंपायर वेळेवर येऊ न शकल्याचे कारण नंतर असे उघड झाले की, थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले होते, ज्यामुळे ते वेळेवर त्यांच्या जागी पोहोचू शकले नाहीत. नियमांनुसार, मैदानी अंपायरसह तिसरे अंपायर असतानाच सामना सुरू करता येतो. क्रिकेटमध्ये अशा घटना क्वचितच पाहायला मिळते, जे मेलबर्न स्टेडियममध्ये पाहायला मिळाले.

हेही वाचा: IND vs SA 1st Test: गेंड्याबरोबर फोटो काढल्याने भारतीय खेळाडूंना ट्रोल करणाऱ्यांना केविन पीटरसनचे दिले सडतोड उत्तर म्हणाला, “काही लोक…”

जर सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३१८ धावा केल्या होत्या. पाकिस्तान पहिल्या डावात सर्वबाद २६४ धावांवर आटोपला होता. सध्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू असून त्याने पाकिस्तानवर १५० धावांची आघाडी घेतली आहे. पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जर ऑस्ट्रेलियाने ही कसोटी जिंकली तर ते मालिकेत अभेद्य आघाडी होईल.

वॉर्नरच्या नावावर खास विक्रम

३८ धावा करूनही वॉर्नरने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. वॉर्नरने स्टीव्ह वॉला मागे टाकले आहे. स्टीव्ह वॉने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १८,४९६ धावा केल्या होत्या. त्याचवेळी वॉर्नर आता स्टीव्ह वॉच्याही पुढे गेला आहे. वॉर्नरच्या नावावर सध्या तिन्ही फॉरमॅटसह १८,५०२ धावा आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये तो आता फक्त रिकी पाँटिंगच्या मागे आहे. पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २७,३६८ धावा केल्या होत्या.

दोन्ही संघांचे प्लेइंग११

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा.