BCCI टीम इंडियाच्या खेळाडूंना किती मानधन देतं? वार्षिक करार यादीत रोहित- विराटला ‘इतके’ कोटी तर सूर्याला फक्त…

BCCI Annual Contract List: बीसीसीआयने सादर केलेल्या यादीत २६ खेळाडूंचा समावेश असून त्यांना A+, A, B आणि C अशा चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहे.

BCCI Annual Contract List Team India Players Fees Per Match Rohit Sharma Virat Kohli hardik Pandya K L rahul Suryakumar Payment
BCCI टीम इंडियाच्या खेळाडूंना किती मानधन देतं? वार्षिक करार यादीत रोहित- विराटला 'इतके' कोटी तर सूर्याला फक्त… (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

BCCI Annual Contract List: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी टीम इंडियाच्या पुरुष खेळाडूंसाठी वार्षिक कराराची यादी जाहीर केली. बीसीसीआयने सादर केलेल्या यादीत २६ खेळाडूंचा समावेश असून त्यांना चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. A+, A, B आणि C अशा श्रेणीनुसार प्रत्येक खेळाडूला ठराविक रक्कम ऑक्टोबर २०२२- सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी बीसीसीआयकडून देण्यात येणार आहे. या यादीनुसार कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार हे जाणून घेऊया..

BCCI टीम इंडियाच्या खेळाडूंना किती मानधन देतं?

A+ (७ कोटी)

  1. रोहित शर्मा
  2. विराट कोहली
  3. जसप्रीत बुमराह
  4. रवींद्र जडेजा

A गट (५ कोटी)

  1. हार्दिक पांड्या
  2. आर अश्विन
  3. मोहम्मद. शमी
  4. ऋषभ पंत
  5. अक्षर पटेल

B गट (३ कोटी)

  1. चेतेश्वर पुजारा
  2. केएल राहुल
  3. श्रेयस अय्यर
  4. मोहम्मद.सिराज
  5. सूर्यकुमार यादव
  6. शुभमन गिल

C गट (१ कोटी)

  1. उमेश यादव
  2. शिखर धवन
  3. शार्दुल ठाकूर
  4. इशान किशन
  5. दीपक हुडा
  6. युझवेंद्र चहल
  7. कुलदीप यादव
  8. वॉशिंग्टन सुंदर
  9. संजू सॅमसन
  10. अर्शदीप सिंग
  11. केएस भारत

यंदा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला रोहित शर्मा व विराट कोहली सह यादीत पदोन्नती मिळाली आहे. तर शिखर धवन आणि केएल राहुल यांना नव्याने जाहीर झालेल्या करारांमध्ये थेट सी गटातील खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 11:18 IST
Next Story
WPL 2023 Prize Money: ऑरेंज कॅपपासून पर्पल कॅपपर्यंत, जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार मिळाला, पाहा संपूर्ण यादी
Exit mobile version