Mahendra Singh Dhoni Viral Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ टी२० मालिकेतील पहिला सामना २७ जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना रांची येथे खेळवला जाणार असून दोन्ही संघ रांचीला पोहोचले आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दिसत आहे. सध्या भारतीय संघ टी२० सामन्यापूर्वी नेट सराव करत असताना त्याच दरम्यान महेंद्रसिंग धोनी स्टेडियममध्ये पोहोचला.

भारतीय खेळाडूंमध्ये कॅप्टन कूल पोहोचला

महेंद्रसिंग धोनीने रांची स्टेडियममध्ये पोहोचून सर्व खेळाडूंना आश्चर्यचकित केले. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी टीम इंडियाचे खेळाडूही त्यांच्या माजी कर्णधाराला पाहून खूप खूश झाले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडत असल्याने यावर चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.  

हार्दिक आणि इशानसोबत धोनीची मस्ती

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एमएस धोनी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंशी गप्पा मारत असल्याचे तुम्ही पाहू शकता. दरम्यान, सामन्यापूर्वी तो काही युवा खेळाडूंना महत्त्वाच्या टिप्सही देत ​​आहे. व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज रांचीमध्ये प्रशिक्षणासाठी कोण आले आहे ते पहा. व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की, माजी भारतीय कर्णधार रांचीच्या आणखी एका स्थानिक मुलासोबत तसेच इशान किशन आणि हार्दिक पांड्यासोबत जास्त वेळ घालवत आहे. दरम्यान, तिघेही कोणत्या ना कोणत्या विषयावर चेष्टा-मस्करी आणि गप्पा मारताना दिसतात. माही हार्दिक आणि इशानला खेचताना दिसत आहे.

हेही वाचा: Ranji Trophy 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रवींद्र जडेजाचे दमदार कॅमबॅक, जादुई फिरकीने फलंदाजांच्या दांड्या गुल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रांची येथे भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेतील पहिला सामना

याआधी, भारतीय संघाने ३ वन डे मालिकेत न्यूझीलंडचा ३-०ने पराभव केला होता. त्याच वेळी, आता दोन्ही संघ टी२० मालिकेत आमनेसामने असतील. सलामीवीर केएल राहुलशिवाय भारतीय संघात अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरसारखे खेळाडू नाहीत. याशिवाय ऋतुराज गायकवाड दुखापतीशी झुंजत आहे. त्याचवेळी, न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे.