भारत आणि श्रीलंका संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० ने अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी होणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघ श्री पद्मनाभस्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात पोहोचला.

टीम इंडिया रविवारी तिरुवनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही सदस्यांनी श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांनी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराला भेट दिली.

शनिवारी सकाळी हे खेळाडू १६व्या शतकातील मंदिराबाहेर पारंपारिक पोशाखात दिसले. भारतीय संघातील खेळाडूंचे पारंपारिक पोशाखातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – Indian squad: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विराट-रोहितला डच्चू ; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kuldeep yadav and axar patel
कुलदीप यादव आणि अक्षर पटेल

श्रीलंका वनडेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.