भारतात आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची धूम असून तिकडे इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी मोठी घडामोड घडली आहे. इंग्लंड पुरुष टेस्ट क्रिकेट टीमच्या कर्णधारपदी बेन स्टोक्सला नियुक्त करण्यात आलंय. तब्बल पाच वर्षांपासून जो रुट टेस्ट टीमचे कर्णधारपद सांभाळत होता. त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कर्णधारपदाची जबाबदारी बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तशी माहिती दिली आहे.

हेही वाचा : Video : गुजरात-हैदराबाद सामन्यामध्ये मुथय्या मुरलीधरनला राग अनावर, डगआऊटमध्ये…

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आता इंग्लंड टेस्ट टीमचा ८१ वा कर्णधार असेल. बेन स्टोक्सने २०१३ साली टेस्ट क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. या काळात सोट्कसने आतापर्यंत ७९ सामन्यांत ५०६१ धावा केलेल्या आहेत. तसे गोलंदाज म्हणून त्याने कसोटी सामन्यांत स्टोक्सच्या नावावर १७४ विकेट्स आहेत. २०१७ साली बेन स्टोक्सला इंग्लंडच्या कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. जो रुटच्या अनुपस्थितीत स्टोक्सने संघाचे यापूर्वीही नेतृत्व केलेले आहे.

हेही वाचा : SRH vs GT : उमरान मलिकच्या ‘रफ्तार’पुढे गुजरात संघ गारद, पठ्ठ्याने एकट्याने घेतल्या पाच विकेट्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्णधारपद स्वीकारल्यानंतर बेन स्टोक्सवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर बेन स्टोक्सनेही सर्वांचे आभार मानले असून माझ्यासाठी आजचा दिवस अभिमानास्पद आहे. मला इंग्लंडसाठी क्रिकेट खेळायला आवडतं. लॉर्ड्सवरील पुढच्या सामन्यात भेटुयात अशी प्रतिक्रिया स्टोक्सने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.