वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन डीब्रूएनेला ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

प्रशिक्षक आणि निवडक पत्रकारांच्या मतांच्या आधारे बेन्झिमा, कोर्टवा आणि डीब्रूएने यांच्या नावांना पसंती देण्यात आली. बेन्झिमाने चॅम्पियन्स लीगच्या गेल्या हंगामात १५ गोल केले होते. तसेच अंतिम लढतीत लिव्हरपूलवरील रेयालच्या विजयात गोलरक्षक कोर्टवाने निर्णायक भूमिका बजावली होती. डीब्रूएनेने प्रीमियर लीग आणि चॅम्पियन्स लीगमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण खेळामुळे त्यालाही नामांकन मिळाले.

‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्कारासाठी रेयालचे कार्लो अँचेलॉटी, लिव्हरपूलचे युर्गन क्लॉप आणि मँचेस्टर सिटीचे पेप ग्वार्डियोला यांची नावे अंतिम शर्यतीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतवर्षीच्या नामांकनातील एकाही खेळाडूला या वर्षीच्या यादीत स्थान मिळालेले नाही. महिला पुरस्कार्थीची अंतिम नामांकन यादी पुढील आठवडय़ात जाहीर करण्यात येणार आहे.