ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बर्टीने शनिवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.

आठव्या मानांकित बर्टीने फक्त एक तास व १० मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा व्होंड्रोसोव्हाला ६-१, ६-३ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारून कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयासह बर्टीने जागतिक टेनिस क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याशिवाय तब्बल ४६ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या टेनिसपटूने फ्रेंच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी मार्गारेट कोर्टने १९७३ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.