विम्बल्डन स्पर्धेत शानदार कामगिरी केलेला भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा सध्याचा नवा सहकारी जर्मन खेळाडू आंद्रे बेगेमान्न या जोडीने एटीपी ५०० सिटी ओपन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे.
बोपण्णा-बेगेमान्न जोडीने पूर्व-उपांत्यफेरीत अलेक्सन्ड्रा पेया आणि ब्रुनो सोआरेस या जोडीचा ६-२, ६-७(४), १०-५ असा पराभव केला. बोपण्णा-बेगेमान्न जोडीचा आता उपांत्य फेरीत फिलीपीन्सचा त्रेअत हुएय आणि ब्रिटनचा डोमिनिक इंग्लोट या जोडीशी होणार आहे.
बोपण्णा-बेगेमान्न जोडीची सावध सुरूवात झाली होती. त्यानंतर दुसऱया सेट पासून सामन्याच्या अखेर पर्यंत बोपण्णा-बेगेमान्न जोडीने उत्कृष्ट कामगिरी केली. सामन्याच्या टाय-ब्रेकरमध्ये बोपण्णा-बेगेमान्न जोडीने ७७ गुण मिळविले तर, प्रतिस्पर्धी अलेक्सन्ड्रा- ब्रुनो जोडीला अवघे ५८ गुण मिळविता आले. शेवटच्या सेट मध्येही आघाडी राखत बोपण्णा-बेगेमान्न जोडीने एटीपीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या अलेक्सन्ड्रा- ब्रुनो जोडीचा पराभव केला आणि उपांत्य फेरीचे दार ठोठावले