Champions Trophy 2025 Live Streaming Updates: बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना येत्या १९ फेब्रुवारीला खेळवला जाईल. यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामन्यातील पहिली लढत होणार आहे. तर भारतीय संघ २० फेब्रुवारीला पहिला सामना खेळणार आहे, ज्यावेळी त्याचा सामना बांगलादेशशी होणार आहे. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे सामने पाहणार कुठे, याबाबत माहिती घेऊया.

नुकताच जिओहॉटस्टार हा नवा अ‍ॅप लाँच करण्यात आला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार आणि जिओ हे दोन्ही अ‍ॅप आता एकत्र झाले आहेत. पण या दोन्ही अ‍ॅपच्या एकत्रिकरणानंतर आता सामने नेमके लाईव्ह कुठे पाहता येतील, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

एकूण ८ संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होतील. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि श्रीलंकासारखे बलाढ्य संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. यजमान पाकिस्तान व्यतिरिक्त भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने भारतात कुठे लाईव्ह पाहता येणार?

या स्पर्धेत १५ सामने खेळवले जाणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे भारतात जियोहॉटस्टारवर प्रसारित होईल. प्रथमच, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयसीसी स्पर्धेचे १६ फिड़्सद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा नऊ वेगवेगळ्या भाषांचा समावेश आहे.

जियोहॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग चार मल्टी-कॅम फीडद्वारे होईल. तर टीव्हीवर इंग्रजी फीड व्यतिरिक्त, स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स १८ चॅनेलवर प्रेक्षक हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्येही सामना पाहू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक

२० फेब्रुवारी – भारत वि. बांगलादेश, दुबई, दुपारी २.३० वाजता
२३ फेब्रुवारी – भारत वि. पाकिस्तान, दुबई, दुपारी २.३० वाजता
२ मार्च – भारत वि. न्यूझीलंड, दुबई, दुपारी २.३० वाजता