Mahish Teekshana shared a video and prayed for Chennai : ‘मिचॉन्ग’ या चक्रीवादळामुळे चेन्नईत मोठा विध्वंस झाला आहे. या वादळामुळे शहरात बराच वेळ मुसळधार पाऊस झाला असून पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी पाणी साचले असून काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहनेही वाहून गेली आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. असाच एक व्हिडीओ सीएसके आणि श्रीलंकेचा फिरकीपटू महिश तीक्षानाने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने चेन्नईतील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्याने या शहराचा आपले दुसरे घर म्हणूनही उल्लेख केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. वादळाच्या आगमनामुळे चेन्नई आणि परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. येथील जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. पावसामुळे चेन्नईचे रस्ते तसेच विमानतळावर पाणी साचले आहे. पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागातील परिस्थिती अशी आहे की, रस्त्यांव्यतिरिक्त लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने एनडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतली आहे.

महिश तीक्षानाने एक्सवर व्हिडीओ शेअर करताना लिहले, ‘मी नुकतेच माझे दुसरे घर चेन्नईशी संबंधित काही फुटेज पाहिले. या वादळामुळे प्रभावित झालेल्या सर्वांसाठी मी माझे प्रेम आणि प्रार्थना पाठवत आहे. सुरक्षित रहा आणि मजबूत रहा. या परिस्थितीत आपण सर्व सोबत आहोत.’

हेही वाचा – IPL 2024 : आरसीबीच्या निर्णयावर ब्रॅड हॉगने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, ‘या’ खेळाडूला खरेदी करून केली मोठी चूक

तीक्षाना गेल्या दोन हंगामांपासून सीएसकेचा संघाचा सदस्य –

आयपीएल २०२४ मध्येही महिश तीक्षाना चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत दिसणार आहे. फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले आहे. आयपीएल २०२२ च्या आधी झालेल्या मेगा लिलावात सीएसकेने महिष तिक्षानाला आपल्या संघात सामील करुन घेतले होते. त्यानंतर सीएसकेने लिलावात श्रीलंकेच्या या फिरकीपटूवर ७० लाख रुपये खर्च केले होते. आयपीएल २०२२ मध्ये, तीक्षानाने 9 सामन्यात १२ विकेट घेत चांगली कामगिरी केली होती. मात्र, आयपीएल २०२३ मध्ये त्याची कामगिरी साधारण होती. गेल्या मोसमात त्याने १२ सामन्यांत ११ बळी घेतले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk player mahish teekshana shared a video and prayed for the people after cyclone michuang hit chennai vbm
First published on: 04-12-2023 at 19:37 IST