scorecardresearch

Premium

IND vs AUS: भारताविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने केली खास कामगिरी, वनडे क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला सातवा ऑस्ट्रेलियन

David Warner’s 49th half century: डेव्हिड वॉर्नरने भारताविरुद्ध ५२ धावा केल्या आणि हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील २९ वे अर्धशतक होते, तर या डावात त्याने वनडेमध्ये षटकारांचे शतकही झळकावले.

David Warner completes 100 sixes in ODIs
डेव्हिड वॉर्नरचे वनडेतील १०० षटकार पूर्ण (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

David Warner completes 100 sixes in ODIs: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोहालीत पहिला वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाज २७६ धावा केल्या. अनेक ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण मोठी खेळी खेळण्यात कोणालाही यश आले नाही. डेव्हिड वॉर्नरने ५३ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि २ षटकार आले. त्याचबरोबर त्याने एक खास शतक झळकावण्याचै कारनामा ही केला.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ५२ धावा करून वॉर्नर बाद झाला, तेव्हा त्याने आपले शतक कसे पूर्ण केले. वास्तविक, भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वॉर्नरने दोन षटकार ठोकले होते. यासह त्याने वनडेत १०० षटकारांचा टप्पा गाठला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० हून अधिक षटकार मारणारा तो ऑस्ट्रेलियाचा सातवा क्रिकेटपटू ठरला आहे.

वॉर्नरने एकदिवसीय कारकिर्दीतील २९ वे अर्धशतक आणि आणि वनडेत १०० षटकार पूर्ण केले –

डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावले, जे त्याचे वनडे फॉरमॅटमधील २९ वे अर्धशतक होते. इतकंच नाही तर वनडेमधली ही ४९वी वेळ होती जेव्हा त्याने ५० हून अधिक धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याचा डाव रवींद्र जडेजाने संपवला आणि तो शुबमन गिलच्या हाती झेलबाद झाला.

हेही वाचा – World Cup 2023: ICC ने वर्ल्ड कपसाठी बक्षीस रक्कम केली जाहीर, जाणून घ्या विजेत्या संघाला किती मिळणार रक्कम?

वनडे क्रिकेटमध्ये १०० हून अधिक षटकार मारणारा वॉर्नर हा सातवा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू –

डेव्हिड वॉर्नरने आता १४८ सामन्यात १०१ षटकार ठोकले आहेत. वॉर्नरपूर्वी रिकी पाँटिंग (१५९ षटकार), अॅडम गिलख्रिस्ट (१४८ षटकार), शेन वॉटसन (१३१ षटकार), अॅरॉन फिंच (१२९ षटकार), ग्लेन मॅक्सवेल (१२८ षटकार) आणि अँड्र्यू सायमंड्स (१०३ षटकार) यांनी ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेत मोडला ट्रेंट बोल्डचा विक्रम, भारतासाठी रचला नवा विश्वविक्रम

शाहिद आफ्रिदीने वनडेमध्ये ठोकले सर्वाधिक षटकार –

वनडे क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांनी संयुक्तपणे सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. दोघांच्या नावावर ३५१ षटकार आहेत. या विक्रम यादीत भारताचा रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. हिटमॅनच्या नावावर २८६ षटकार आहेत.
या सामन्यात वॉर्नरने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची चांगली भागीदारी केली. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध ६० चेंडूत ४१ धावांची खेळी केली. शमीने त्याला क्लीन बोल्ड केले. त्याचबरोबर मार्शने केवळ ४ धावा केल्या आणि तोही मोहम्म शमीच्या चेंडूवर गिलने झेलबाद केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: David warner completes 100 sixes in odis and 29th half century against india vbm

First published on: 22-09-2023 at 19:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×