भारत आणि बांगलादेश संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामना रविवार खेळला जाणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरचे ट्विट चर्चेत आले आहे. कारण दीपक चहरने सोशल मीडियावर पोस्टद्वारे मलेशिया एअरलाइन्सवर आपला संताप व्यक्त केला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे उद्या खेळला जाणार आहे, दीपक चहर, शिखर धवनसह अनेक खेळाडू अजूनही त्यांच्या सामानाची वाट पाहत आहेत. याबाबत तक्रार करताना क्रिकेटपटूने एअरलाइन्सचे व्यवस्थापन निकृष्ट असल्याचे सांगितले.

दीपक चहर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग असलेल्या खेळाडूंसोबत ढाका येथे पोहोचला होता. खेळाडू गुरुवारी ढाका येथे पोहोचणार होते, मात्र अखेरच्या क्षणी विमान कंपनीने प्रवाशांना न कळवता विमान बदलले. त्यामुळे दीपक चहरने ट्विटरवर त्यांना टॅग करून एअरलाइनबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच एअरलाइनबद्दलचा त्यांचा अनुभव सर्वात वाईट असल्याचे वर्णन केले. तसेच त्याने नमूद केले की, आम्हाला उद्या सामना खेळायचा आहे आणि आम्ही अजूनही आमच्या सामानाची वाट पाहत आहोत.

दीपक चहर तक्रारीत काय म्हणाला –

दीपक चहर यांनी लिहिले, ”मलेशिया एअरलाइन्सचा अनुभव खूपच खराब होता. सर्वप्रथम त्यांनी आम्हाला न कळवता आमची फ्लाइट बदलली. बिझनेस क्लासमध्ये असूनही आम्हाला जेवण देण्यात आले नाही. त्याचबरोबर आता आम्ही गेल्या २४ तासांपासून आमच्या सामानाची वाट पाहत आहोत. विचार करा, आम्हाला उद्याचा सामना खेळायचा आहे.”

मलेशिया एअरलाइन्सने या तक्रारीबद्दल माफी मागितली आणि लवकरच दीपक चहरशी संपर्क साधण्यास सांगितले. लवकरच सामना मिळेल, असे आश्वासन दिले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ”आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल, तुम्ही तुमच्या तक्रारीसाठी फीडबॅक फॉर्म भरा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.