टीम इंडिया २३ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आपला प्रवास सुरू करणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा एक खेळाडू खेळणे अवघड आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यातही या खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली नाही.

पाकविरुद्ध ‘हा’ खेळाडू खेळणे अवघड –

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ जवळपास निश्चित झाली आहे, अशा परिस्थितीत २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणार्‍या भारत-पाकिस्तान सामन्यात अष्टपैलू दीपक हुड्डा खेळणे कठीण आहे. दीपक हुड्डाला सराव सामन्यातही खेळण्याची संधी मिळाली नाही. दीपक हुड्डा पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर या स्पर्धेत खेळण्यासाठी आला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल टीम इंडियाची पहिली पसंती असणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे, अशा परिस्थितीत या मोठ्या सामन्यात दीपक हुड्डाला बेंचवर बसावे लागू शकते.

हेही वाचा : T20 World Cup 2022: न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाला संघातील उणीवा दूर करण्याची शेवटची संधी

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार आकडेवारी –

दीपक हुड्डाने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण १२ टी२० आणि ८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने सर्व सामने जिंकले आहेत. दीपक हुड्डाने आतापर्यंत खेळलेल्या १२ टी२० सामन्यांमध्ये ४१.८६ च्या सरासरीने २९३ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये दीपक हुडाने २८.२ च्या सरासरीने १४२ धावा केल्या आहेत.

टी२० विश्वचषकासाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखीव खेळाडू –

शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.