डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचे आव्हान संपुष्टात

ऑगस्टमध्ये टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला पहिल्याच स्पर्धेत पाचव्या मानांकित अ‍ॅन सेयंगपुढे निभाव लागला नाही.

ओडेन्से : ऑलिम्पिक पदकानंतरचे पी. व्ही. सिंधूचे पुनरागमन डेन्मार्क खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मर्यादित राहिले. महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावरीज कोरियाच्या अ‍ॅन सेयंगने सरळ गेममध्ये सिंधूचा पराभव केला.

ऑगस्टमध्ये टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला पहिल्याच स्पर्धेत पाचव्या मानांकित अ‍ॅन सेयंगपुढे निभाव लागला नाही. फक्त ३६ मिनिटांत सिंधूने ११-२१, १२-२१ अशा फरकाने गाशा गुंडाळला. दोन वर्षांपूर्वी या दोन खेळाडूंमध्ये झालेल्या एकमेव लढतीतसुद्धा सिंधूने सेयंगकडून पराभव पत्करला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Denmark open badminton tournament p v sindhu the return of the indus akp

Next Story
सचिन संपलेला नाही!