scorecardresearch

श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल बोलताना गौतम गंभीरने ‘NCAवर उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, ‘प्रश्न विचारायचेच असतील, तर…’

Gautam Gambhir on Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल बोलताना गौतम गंभीरने एनसीएच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने विचारले की, श्रेयस अय्यरला खेळण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर लगेच पुन्हा दुखापत कशी झाली.

Gautam Gambhir's statement on Shreyas Iyer
श्रेयस अय्यरबाबत गौतम गंभीरचे वक्तव्य (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

Gautam Gambhir raises question on NCA about Shreyas Iyer Fitness: आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर टप्प्यातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर तो पुन्हा अनफिट झाला. याआधीही त्याला पाठीचा त्रास होता, त्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर श्रेयस अय्यर संपूर्ण आशिया कपमध्ये खेळला नाही. फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, श्रेयस ९९ टक्के फिट आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने श्रेयस अय्यरच्या विश्वचषक संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. श्रेयस अय्यरला फिटनेस क्लिअरन्स देण्यास बेंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) घाई करत होती का? गंभीर म्हणाला की, श्रेयस अय्यरने बर्‍याच काळानंतर पुनरागमन केले आणि त्यानंतर केवळ एका सामन्यानंतर तो अनफिट झाला. तो म्हणाला की, अय्यर विश्वचषकाचा भाग होणार नाही. अशा मोठ्या स्पर्धांमध्ये संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवणार नाही.

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
World Cup 2023 Updates
World Cup 2023: सूर्याला विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी पाहावी लागेल वाट, सुनील गावसकरांनी सांगितले कारण
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन

श्रेयस अय्यरबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर?

श्रेयस अय्यरबद्दल गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला, “ही चिंतेची बाब आहे. तुम्ही इतके दिवस बाहेर होता आणि नंतर आशिया कपसाठी परत येता, एक सामना खेळता आणि परत अनफिट होता. मला वाटत नाही की, यानंतर संघ व्यवस्थापन एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी त्याची निवड करेल. अय्यर विश्वचषक संघाचा भाग नसून त्याची जागा दुसरे कोणीतरी घेणार हे येत्या काही दिवसांत तुम्हाला दिसेल. तुम्ही नेहमी तंदुरुस्त खेळाडूंसोबत वर्ल्डकपला जायला हवे.”

हेही वाचा – VIDEO: “जर धोनी कर्णधार नसता, तर तो भारताकडून…”; माहीबाबत गौतम गंभीरचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

सध्या फॉर्म कसा आहे माहीत नाही –

गौतम गंभीर म्हणाला, “प्रदर्शन ही वेगळी गोष्ट आहे. कल्पना करा की एखादा खेळाडू क्रॅम्प्स किंवा इतर कशाने त्रस्त असेल, तर तुम्हाला त्याची रिप्लेसमेंट मिळू शकत नाही. त्यामुळे जर अय्यर या स्पर्धेसाठी तंदुरुस्त नसेल, तर त्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाचा भाग असणे त्याच्यासाठी खूप कठीण आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याचा सध्याचा फॉर्म कसा आहे हे माहित नाही.”

हेही वाचा – IND vs SL: ‘भारत विश्वचषकातील सर्वात धोकादायक संघ…’; टीम इंडियाबद्दल बोलताना शोएब अख्तरने रोहितच्या नेतृत्त्वाचे केले कौतुक

गौतम गंभीरने एनसीएच्या कामावर उपस्थित केले प्रश्न –

गौतम गंभीर म्हणाला, “त्याचा कोणताही फॉर्म असला तरी तो ७-८ महिन्यांपूर्वीचा होता. त्यानंतर तो फक्त एकच सामना खेळला होता. त्यामुळे हे दुर्दैवी आहे. प्रश्न विचारायचेच असतील, तर एनएसीएला विचारा. कारण तो इतके महिने तिथे होता आणि त्याला तिथून मंजुरीही मिळाली. कोणास ठाऊक, कदाचित त्यांनी खूप लवकर मंजुरी दिली असेल?”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautam gambhir raised questions on the functioning of nca while talking about the fitness of shreyas iyer vbm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×