Hanuma Vihari breaks silence on selection in team india: हनुमा विहारी दीर्घकाळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. तो सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून खेळत आहे. हनुमा विहारी भारतीय संघात पुनरागमन करू शकेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, हनुमा विहारीने त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल आणि बीसीसीआयच्या निवडकर्त्यांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय क्रिकेटपटू म्हणाला की मला टीम इंडियातून का वगळण्यात आले, आजपर्यंत मला कळू शकले नाही.

हनुमा विहारी भारतीय संघासाठी ४ कसोटीत दिसला पण नंतर त्याला वगळण्यात आले. गेल्या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. हनुमा अजूनही भारतीय संघातून का वगळले याचे कारण शोधत आहे.

दुलीप ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून खेळत असलेल्या विहारीने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मला संघातून का वगळण्यात आले, याचे कारण मला अद्याप सापडलेले नाही. हीच एक गोष्ट आहे, जी मला सतत सतावत असते. मला संघातून का वगळण्यात आले हे सांगण्यासाठी कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही.”

यानंतर विहारीने सांगितले की, संघ निवडीबाबत त्याला शांत राहण्याचा मार्ग सापडला आहे. तो म्हणाला, “मला थोडा वेळ लागला आणि मी सतत चढ-उतारांमधून जात होतो, पण आता मला काळजी वाटत नाही. मी माझ्या वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवल्या आहेत. त्यामुळे आता मी भारतीय संघात आहे की नाही याचा जास्त ताण घेत नाही. येथे आणखी सामने जिंकण्याची संधी आहे आणि फक्त ट्रॉफी जिंकणे ही बाब आहे.”

हेही वाचा – IND vs WI 1st Test: विराट कोहलीने केला आणखी एक मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरसोबत ‘या’ खास क्लबमध्ये झाला सामील

टीम इंडियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या चक्राला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मोहिमेची सुरुवात वेस्ट इंडिज दौऱ्याने केली आहे, जिथे तो दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेसाठी यशस्वी जैस्वाल, इशान किशन या युवा चेहऱ्यांना संघात संधी देण्यात आली आहे, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये जयदेव उनाडकटसारख्या अनुभवी गोलंदाजाला पुन्हा एकदा टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. परंतु निवडकर्त्यांना त्यांच्या योजनांमध्ये बसण्यासाठी हनुमा विहारीसारखा मधल्या फळीतील फलंदाज सापडला नाही.