Harbhajan Singh Apologizes for Tauba Tauba Song Reel: लिजेंड्स चॅम्पियनशिपचे जेतेपद युवराज सिंगच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पटकावले. फायनलमधील विजयानंतर हरभजन सिंग, सुरेश रैना आणि युवराज सिंगसह काही माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर एक रील शेअर केली. या व्हिडिओमध्ये हे सर्व जण विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ या गाण्यावर एक मजेशीर डान्स करताना दिसले. पण या माजी क्रिकेटपटूंच्या डान्स स्टेपवर सर्वांनी टीका केल्याने हरभजनने हा व्हीडिओ डीलीट केला आहे आणि सर्वांची जाहीर माफीदेखील मागितली आहे.

हेही वाचा – Champions Trophy 2025: ‘भारतीय संघ पाकिस्तानात नाही आला तर…’, PCB ने BCCIला दिली धमकी?

प्रसिद्ध पॅरा-बॅडमिंटनपटू मानसी जोशी यांनी माजी भारतीय क्रिकेटपटूंनी बनवलेल्या या रीलवर जोरदार टीका केली. भारतीय क्रिकेटपटूंनी अपंगत्वाची खिल्ली उडवली आहे, असे मानसी जोशींचे मत आहे. मानसी जोशीच नाही तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड वेल्फेअर (NCPEDP) चे कार्यकारी संचालक अरमान अली यांनीही या क्रिकेटपटूंविरोधात आमिर कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

हरभजन सिंगने विनोद म्हणून बनवलेल्या या व्हिडिओ रीलवर स्पष्टीकरण दिले आहे आणि सर्वांची माफीही मागितली आहे. हरभजनने सांगितले की, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला दुखावण्याचा नव्हता. सलग १५ दिवस क्रिकेट खेळून आमचे शरीर थकले आहे हे दाखवायचे होते. मात्र, ज्यांना व्हिडिओ आवडला नाही, त्यांची माफी मागितली आणि व्हीडिओही डिलीट केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने सोशल मीडियावर लिहिले की, ‘इंग्लंडमध्ये चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आम्ही ‘तौबा तौबा’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्याबद्दल काही लोक तक्रार करत आहेत. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही प्रत्येक व्यक्ती आणि समुदायाचा आदर करतो. १५ दिवस सतत क्रिकेट खेळल्यानंतर आमच्या शरीराची काय अवस्था होते हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आमचा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता. तरीही आमची चूक झाली असे लोकांना वाटत असेल तर मी सर्वांची माफी मागतो. कृपया हा मुद्दा इथेच संपवा आणि पुढे जाऊया.’