भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहकडे विजय हजारे चषकात पंजाबचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. ७ ते १६ फेब्रुवारीदरम्यान कर्नाटकच्या अलुर येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यासाठी पंजाबच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी युवराज सिंहकडे संघाच्या उप-कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या स्पर्धेत पंजाब ७ फेब्रुवारीरोजी आपला पहिला सामना हरयाणाविरुद्ध खेळणार आहे.

विजय हजारे चषकासाठी असा असेल पंजाबचा संघ –

हरभजन सिंह (कर्णधार), युवराज सिंह (उप-कर्णधार), मनन व्होरा, मनदीप सिंह, गुरकिरत सिंह मान, अभिषेक गुप्ता, गितांश खेरा, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, अभिषेक शर्मा, शुभमन गिल, मनप्रीत सिंह गेरवाल, बिरेंदर सिंह सरन, मयांक मार्कंडे, शरद लुंबा