Shoaib Akhtar vs Mohammad Shami: क्रिकेटच्या इतिहासातील दोन वेगळ्या पिढीतील दोन सर्वात वेगवान गोलंदाज, शोएब अख्तर आणि मोहम्मद शमी यांच्यात मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर खटके उडत आहेत. टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानचा पराभव होताच हा वाद सुरु झाला आणि आता त्यावरून अनेक कमेंट्स ऑनलाईन व्हायरल होऊ लागल्या आहेत. पाकिस्तान हरताच शोएब अख्तर यांनी केलेल्या एका ट्वीटवर मोहम्मद शमी याने प्रतिक्रिया देत पाकिस्तान कर्माने हरले आहे असं म्हणत थेट पंगा घेतला होता, यानंतर अनेक पाकिस्तानी दिग्गज खेळाडूंनी शमीवर पलटवार करून सुनावले होते. या एकूण प्रकरणात मुळात शमीने शोएब अख्तरशी पंगा घेण्याचं कारण काय होतं हे आता समोर येत आहे.

शोएब अख्तर विरुद्ध मोहम्मद शमी या वादाची ठिणगी स्वतः शोएब अख्तरनेच टाकली होती असे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. खरंतर झालं असं की, टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड अशी लढत पाहायला मिळाली, यात भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनाही बाद करणे जमले नाही, परिणामी जोस बटलर व हेल्सच्या भागीदारीने इंग्लंडने १० गडी राखून भारताचा पराभव केला. यांनतर शोएब अख्तरने आपल्या युट्युब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट करून टीम इंडियाला सुनावले होते.

रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अख्तरने यावेळी शमीवर कडाडून टीका केली होती. ” टीम इंडिया शमीला अचानक उचलून घेऊन आली व संघात सामील केले, तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे, परंतु संघात येण्यास पात्र नाही, शमीच्या ऐवजी चहल खेळू शकला असता” असेही अख्तर म्हणाला होता. पाकिस्तानचा पराभव होताच याच व्हिडीओवरून शमीने अख्तरला पराभव हा कर्माचे फळ आहे असं सुनावलं होतं. यात पुढे वसीम अक्रम, शाहीद आफ्रिदी व अन्य पाकिस्तानी क्रिकेट संघातील माजी खेळाडूंनी अख्तरची पाठराखण करत शमीला सुनावले होते.

मोहम्मद शमी विरुद्ध शोएब अख्तर वाद का सुरु झाला?

जळत्यावर तेल टाकून… शोएब अख्तर vs मोहम्मद शमी वादात वसीम अक्रमची उडी; शमीला स्पष्ट शब्दात इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, टीम इंडियाने टी २० विश्वचषकाच्या सुपर 12 टप्प्यात खरोखरच चांगली कामगिरी केली, 5 पैकी 4 सामने जिंकून गट 2 च्या पॉईंट टेबल मध्ये रोहित शर्माचा संघ टॉपला होता. उपांत्य फेरीत मात्र त्यांना इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले. शमीसाठी मात्र विश्वचषक हा संमिश्र होता, सुपर १२ टप्प्यात शमीने ६ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या होत्या. शमीने उपांत्य फेरीत मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी एकही विकेट न घेता ३९ धावा दिल्या होत्या