IND Vs PAK Highlights: भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात आज विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीने भारताने दणदणीत विजय मिळवला. मागील विश्वचषकात पाकिस्तानने दहा गडी राखून भारताला पराभूत केले होते, आशिया चषकातही भारताच्या हातातील विजय पळवून पाकिस्तानने कोट्यवधी भारतीयांचा हिरमोड केला होता. मात्र दिवाळीच्या पूर्वसंध्येला आता विराट कोहली, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग यांच्या दमदार खेळीनंतर भारताने सर्व अपमानांचा बदला पूर्ण केला आहे. भारताच्या अभूतपूर्व विजयावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना तिकडे पाकिस्तानने मात्र भलतीच रडारड सुरु केली आहे.

आजच्या सामन्यात पराभवांनंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या समर्थकांकडून ट्विटर वर #Cheating असा हॅशटॅग व्हायरल करण्यात येत आहे. यामध्ये भारताच्या बाजूने पंचही खेळत होते असे म्हणत पाकिस्तानी चाहत्यांनी ट्रोलिंग सुरु केले आहे. आपण व्हायरल ट्विटमध्ये पाहू शकता की माजी क्रिकेटर नासिर हुसेन यांनी सुद्धा भारतावर आरोप लगावल्याचा दावा केला आहे. पंचांनी आज भारताच्या बाजूने खेळताना काही विचित्र निर्णय दिले मात्र आपण आता त्याच्या भारताच्या किंवा BCCI, ICC च्या विरुद्ध न बोलता शांतच राहायला हवं व वाईटही वाटून घेता कामा नये अशी उपहासात्मक प्रतिक्रिया हुसेन यांनी दिल्याचे या ट्वीटमध्ये लिहिण्यात आले आहे.

दरम्यान, अन्य ट्विटमध्ये रविचंद्रन आश्विनचा फोटो शेअर करून त्याने मैदानाला चेंडूने स्पर्श केल्यावर कॅच धरल्याचा आरोपही पाकिस्तानी समर्थकांनी केला आहे.

शेवटच्या षटकात मोहम्मद नवाझने टाकलेला बॉल हा नो बॉल नव्हता असेही ट्वीट पोस्ट करण्यात आले आहेत. (IND vs PAK Video: विराटच्या डोळ्यात अश्रू पाहताच कॅप्टन रोहितची मैदानाकडे धाव; कोहलीजवळ आला अन…)

यावेळी काहींनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड विरुद्ध सामन्यातील दीप्ती शर्माने घेतलेल्या विकेटवरूनही ट्रोल केले आहे. (IND vs PAK Highlight: किंग कोहली इज बॅक! भारत विरुद्ध पाकिस्तानच्या शेवटच्या षटकात ‘असा’ रंगला थरार)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या सर्व ट्रोलिंगला भारतीय समर्थकही तोडीस तोड उत्तर देत आहेत. भारताने आजचा सामना जिंकल्यावर देशभरात दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. फटाके फोडून देशभरात टीम इंडियाचं यश साजरं केलं जात आहे.