Kapil Dev advice to Team India Play as a team not individuals : टीम इंडियाला आज उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करायचा आहे. आज जिंकणारा संघ विजेतेपदासाठी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. गेल्या १० वर्षांपासून, आयसीसी स्पर्धांमध्ये बाद फेरी गाठल्यानंतर भारताला विजेतेपद मिळवण्यात वारंवार अपयश आले आहे. अशा परिस्थितीत भारताचे पहिले विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी गुरुवारी टीम इंडियाला एक सल्ला दिला आहे. ते म्हणाला की, रोहित शर्मा आणि कंपनी वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी-२० विश्वचषक जिंकू शकेल की नाही हे ठरवण्यात वैयक्तिक नसून सामूहिक कामगिरी महत्त्वाची भूमिका बजावेल.

कपिल देव काय म्हणाले?

कपिल देव यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, “आपण फक्त रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या किंवा कुलदीप यादव यांच्याबद्दलच का बोलावे? प्रत्येकाची भूमिका आहे. स्पर्धा जिंकणे हे त्यांचे काम आहे. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी कोणत्याही एका खेळाडूची कामगिरी महत्त्वाची ठरू शकते, परंतु स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. आपण फक्त बुमराह किंवा अर्शदीपवर अवलंबून राहिलो तर आम्हाला विजयाची नोंद करणे कठीण होईल.”

कपिल देव यांनी सांगितला १९८३ चा गेम प्लॅन –

कपिल देव १९८३ चा गेम प्लॅन सांगताना म्हणाले, “आपण संघाबद्दल बोलले पाहिजे. हे तुम्हाला कोणत्याही एका खेळाडूपेक्षा चांगला दृष्टीकोन देते. एक प्रमुख खेळाडू असू शकतो पण विश्वचषक जिंकण्यासाठी प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल.” कपिल देव पुढे म्हणाले, “१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघात कामगिरी करणारा ते एकमेव खेळाडू नव्हते. रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ, कीर्ती आझाद, यशपाल शर्मा या सर्वांनी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला. तुम्ही एका खेळाडूवर अवलंबून राहण्यास सुरुवात केल्यास, याचा अर्थ असा की तुम्ही स्पर्धा अधिक वेळा जिंकू शकणार नाही.”

हेही वाचा – T20 World Cup 2024 च्या ट्रॉफीवर ‘हा’ संघ कोरणार नाव? आधीच करण्यात आलीय भविष्यवाणी; जुनं ट्वीट होतंय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा –

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी कपिल देव यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आणि संघ ट्रॉफी जिंकेल अशी आशा व्यक्त केली. भारताचा हा माजी कर्णधार म्हणाला, “संघाला माझ्या शुभेच्छा. मला आशा आहे की भारतीय खेळाडू जसे खेळत आहेत, तसेच खेळ करत राहतील. असे घडू नये की त्यांचा दिवस खराब आहे आणि ते स्पर्धेबाहेर आहेत (जसे गेल्या वेळी ५० षटकांच्या विश्वचषकात घडले होते). त्यांना सलाम. मी टीम इंडियाला शुभेच्छा देतो आणि त्याच्या आनंदासाठी प्रार्थना करतो.”