U-19 India vs Nepal Asia Cup 2023: दुबईत सुरू असलेल्या अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना नेपाळशी संपन्न झाला. भारतीय गोलंदाजांनी दुबळ्या नेपाळला २२.१ षटकात ५२ धावांत गुंडाळले. टीम इंडियाकडून राज लिंबानीने सर्वाधिक सात विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या ७.१ षटकांत एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले. भारताकडून आदर्श सिंगने १३ चेंडूत १३ धावा केल्या आणि अर्शीन कुलकर्णीने ३० चेंडूत ४३ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार आणि पाच षटकार मारले.

भारतीय संघाचा हा तिसरा सामना होता. शेवटच्या दोनपैकी एक जिंकला आणि दुसरा हरला. गेल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध आठ विकेट्सने पराभव झाला होता. या पराभवानंतर भारतीय संघाने पुन्हा एकदा आशिया चषकात पुनरागमन केले आहे. त्यांनी हा दणदणीत विजय मिळवत अ गटात पहिले स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानपूर्वी भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला होता आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

Elon Musk China Visit
भारताचा दौरा रद्द केल्यानंतर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क अचानक चीनच्या दौऱ्यावर
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Katchatheevu Island
पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे, ब्रिटिशांकडून भारताकडे, भारताकडून श्रीलंकेकडे… कचाथीवू बेटाचा वादग्रस्त प्रवास!

भारताचे शेवटचे दोन सामने

भारताने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान अंडर-१९ संघाचा पराभव केला होता. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत अफगाणिस्तानला अवघ्या १७३ धावांत गुंडाळले आणि भारतीय संघाने सात विकेट्स राखून ही धावसंख्या गाठली. अर्शीन कुलकर्णीने भारताकडून जबरदस्त कामगिरी करत ७० धावा केल्या आणि तीन विकेट्स घेत अष्टपैलूची महत्वपूर्ण भूमिका बजावली.

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शुबमन-ऋतुराज सलामीला फलंदाजी करणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

दुसऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने नऊ गडी गमावून २५९ धावा केल्या. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. आदर्श सिंगने सर्वाधिक ६२ धावा केल्या. उदय सहारनने ६० आणि सचिन दासने ५८ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४७ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. अझान अवेसने नाबाद १०५ धावांची तर कर्णधार साद बेगने ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. शमाईल हुसेन आठ धावा करून बाद झाला तर शाजेब खान ६३ धावा करून बाद झाला.

हेही वाचा: IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी-२० सामन्यात पावसाची शक्यता, कसे असेल सेंट जॉर्ज पार्कमधील हवामान? जाणून घ्या

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

भारत: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, उदय सहारन (कर्णधार), सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश, सौमी पांडे, मुरुगन अभिषेक, आराध्या शुक्ला, राज लिंबानी.

नेपाळ: दीपक बोहरा, अर्जुन कुमल, उत्तम मगर, देव खनाल (कर्णधार), गुलशन झा, दीपक डुमरे, दीपक बोहरा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, हेमंत धामी.